Breaking News

राज्यातील ४० हजार रूग्णांपैकी ३३ हजार रूग्ण मुंबईसह ठाण्यात: कोठे किती रूग्ण वाढले ७ लाख ४२ हजार होम क्वारंटाईन मध्ये

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात आज दिवसभरात मुंबई, ठाणेसह राज्यात ४० हजार ९२५ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण हे एकट्या मुंबईत असून मुंबईत २० हजार ९७१ रूग्ण आढळून आले तर ठाण्यातील ठाणे शहर-जिल्हा, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी-निझामपूर, पनवेल, रायगड, पालघर आदी ठिकाणी १३ हजार रूग्ण असे मिळून मुंबई ठाण्यात ३३ हजार २३५ रूग्ण तर उर्वरित महाराष्ट्रात ७ हजार रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज एकही ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळून आला नाही.

आज दिवसभरात २० रूग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर २.०७ टक्के इतका आहे. तर राज्याच्या दृष्टीने दिलासादायक म्हणजे १४ हजार ९२५ रूग्ण कोरोनातून बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा ९५.८ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०१,४६,३२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६८,३४,२२२ (९.७४  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ७ लाख ४२ हजार ६८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून १४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २०९७१ ८७२७३० १६३९४
ठाणे ७८७ १०४३०८ २२३४
ठाणे मनपा २६१२ १५६६०२ २१२४
नवी मुंबई मनपा २६६४ १३२०८० २०१३
कल्याण डोंबवली मनपा ११८८ १५८२५० २८७३
उल्हासनगर मनपा १८४ २२८८६ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ११० ११६३७ ४८९
मीरा भाईंदर मनपा १२०१ ६४९६८ १२०६
पालघर ३१८ ५७४३२ १२३४
१० वसईविरार मनपा ११३७ ८६७६४ २०९२
११ रायगड ६४० १२०८९८ ३३९२
१२ पनवेल मनपा १४२३ ८३०३९ १४३६
ठाणे मंडळ एकूण ३३२३५ १८७१५९४ ३६१५०
१३ नाशिक १९० १६५२६० ३७६१
१४ नाशिक मनपा ६१५ २४०६८९ ४६६२
१५ मालेगाव मनपा १०१८४ ३३६
१६ अहमदनगर १०१ २७५१५५ ५५२८
१७ अहमदनगर मनपा ६१ ६९१८१ १६३६
१८ धुळे ११ २६२६१ ३६२
१९ धुळे मनपा १९९९५ २९४
२० जळगाव २२ १०७१४९ २०५९
२१ जळगाव मनपा २२ ३२९५९ ६५७
२२ नंदूरबार १० ४००७४ ९४८
नाशिक मंडळ एकूण १०४३ ९८६९०७ २०२४३
२३ पुणे ६५४ ३७२०२४ ७०४६
२४ पुणे मनपा २८०४ ५३६०२९ ९२७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९७९ २७४४५३ ३५२८
२६ सोलापूर ५५ १७८९१२ ४१४०
२७ सोलापूर मनपा ४४ ३२८६६ १४७५
२८ सातारा २२९ २५२५२१ ६४९८
पुणे मंडळ एकूण ४७६५ १६४६८०५ १० ३१९६६
२९ कोल्हापूर ५४ १५५५६५ ४५४४
३० कोल्हापूर मनपा ११३ ५१९०१ १३०६
३१ सांगली ४९ १६४६०८ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५१ ४६०९७ १३५२
३३ सिंधुदुर्ग ४० ५३२५५ १४४९
३४ रत्नागिरी ८२ ७९५७५ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण ३८९ ५५१००१ १५४२९
३५ औरंगाबाद ३१ ६२७११ १९३५
३६ औरंगाबाद मनपा १२७ ९३९६२ २३२९
३७ जालना २८ ६०९३२ १२१५
३८ हिंगोली १८५०९ ५०८
३९ परभणी १२ ३४२५० ७९३
४० परभणी मनपा १८३१५ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण २११ २८८६७९ ७२२३
४१ लातूर ४९ ६८६७७ १८०२
४२ लातूर मनपा १९ २३९९२ ६४५
४३ उस्मानाबाद ३६ ६८३६२ १९९०
४४ बीड १८ १०४२५८ २८४३
४५ नांदेड २६ ४६६१८ १६२६
४६ नांदेड मनपा ४६ ४४०९५ १०३४
लातूर मंडळ एकूण १९४ ३५६००२ ९९४०
४७ अकोला २२ २५५८६ ६५५
४८ अकोला मनपा ४३ ३३४४१ ७७३
४९ अमरावती १० ५२५४९ ९८९
५० अमरावती मनपा १७ ४३९३६ ६०९
५१ यवतमाळ ३२ ७६१५७ १८००
५२ बुलढाणा २४ ८५६९८ ८१२
५३ वाशिम ४१७१३ ६३७
अकोला मंडळ एकूण १५७ ३५९०८० ६२७५
५४ नागपूर ८५ १२९८३७ ३०७५
५५ नागपूर मनपा ६१२ ३६६२२५ ६०५४
५६ वर्धा ४१ ५७४४६ १२१८
५७ भंडारा १९ ६००७६ ११२४
५८ गोंदिया ४५ ४०६३१ ५७१
५९ चंद्रपूर २० ५९४५१ १०८८
६० चंद्रपूर मनपा ३२ २९७४९ ४७८
६१ गडचिरोली ७७ ३०५९५ ६६९
नागपूर एकूण ९३१ ७७४०१० १४२७७
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ४०९२५ ६८३४२२२ २० १४१६१४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *