Breaking News

अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात: आर्थिक वाढ ८ टक्क्याहून अधिक- अर्थमंत्री उद्या होणार देशाचा अर्थसंकल्प सादर

मराठी ई-बातम्या टीम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेत केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीथारामण यांनी २०२२-२३ चा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल मांडला. हा अहवाल लोकसभेत मांडताना भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज असल्याचे सांगत हा अर्थवाढीचा वेग ९ टक्क्यांपर्यंत जाण्याचीही शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडण्यात आला. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नसल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केले.

दरम्यान, अधिवेशनाची सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सर्व पक्षियांना आवाहन करताना म्हणाले की, पाच राज्यात निवडणूका सुरु आहेत. मात्र देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी सर्वांनी मोकळ्या पध्दतीने चर्चा करावी असे आवाहन करत येणाऱ्या आगामी वर्षात देशाला विकासाच्या एका नव्या उंचीवर जाण्याच्या संधी निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली.

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *