Breaking News

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी, इतके झाले दर ६० हजारावर तर २२ कॅरेट ५६ हजार

दसऱ्याच्या दिवशी देशभरात सोन्याचे भाव वाढले आहेत. बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर ६१,७०० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. बहुतेक दागिने २२ कॅरेट सोन्यात बनवले जात असून २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,७०० रुपयांच्या वर आहे. आगामी काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. सणासुदीला सुरुवात होताच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये सोन्याचा दर
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत ५६,७०० रुपये रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

दिल्लीत सोन्याचा दर
दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५६,७०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. २४ कॅरेटसाठी ग्राहकांना ६१,८४० रुपये प्रति १० ग्रॅम मोजावे लागतील.

मोठ्या शहरांमधील सोन्याचे दर

शहर – २२ कॅरेट सोन्याचा दर – २४ कॅरेट सोन्याचा दर
अहमदाबाद – ५६,६०० – ६१,६९०
गुरुग्राम – ५६,७०० – ६१,८४०
कोलकाता – ५६,५५०; ६१,६९०
लखनौ – ५६,७००-६१,८४०
बंगलोर – ५६,५५०- ६१,६९०
जयपूर – ५६,७००-६१,८४०
पाटणा – ५६,६००-६१,७४०
भुवनेश्वर – ५६,५५०-६१,६९०
हैदराबाद – ५६,५५०- ६१,६९०

सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होईल.

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *