Breaking News

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आता पाडणार…. भगवान गडावर लाखोंच्या साक्षीने पंकजा मुंडे यांची घोषणा

मागील काही दिवसांपासून थोडंस विजनवासात गेलेल्या आणि पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करत उपस्थित लाखो लोकांच्या समुदायाच्या उपस्थित मी आतापर्यंत तुमची मान शरमेने खाली जाईल अशी गोष्ट केली का असा सवाल जनसमुदायाला विचारत असे काम मी कधीही केले नाही. मागील निवडणूकीत हरले. निवडणूकीत जय पराजय हे होतच असतात. पण मागील निवडणूकीत मी हरले. मात्र आता येणाऱ्या निवडणूकीत पाडणार असल्याचा इशारा भाजपाच्या नेत्यांना आणि त्यांचे बंधू तथा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न पाहिलं त्यासाठी आता मी पुढे आले आहे. मागील निवडणूकीत पाडणाऱ्यांना यावेळच्या निवडणूकीत पाडणार आहे. जरी मी निवडणूकीत हरले असले तरी जो चारित्र्यहीन असेल पैशाच्या जोरावर राजकारण करत असेल त्याला पाडणार आहे. जो शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताचं राजकारण करत नसेल, तरूणांना बेरोजगारीतून बाहेर काढणार नाही, जो महाराष्ट्राच्या गतवैभवाला अडसर ठरेल त्याला पाडणार आहे असा इशाराही दिला.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आता फक्त मेरिट राहिल समाजासाठी सेवा करणारं नेतृत्व करणार नेतृत्व असेल, चारित्र्यसंपन्न नेतृत्वासाठी मी रात्रीचा दिवस करणार आहे. मला काही मिळो न मिळो पण पुढची पिढी गोड जेवण जेवेल त्यासाठी माझं आयुष्य खर्ची घालेन असा निर्धारही यावेळी बोलून दाखविला

तसेच पंकजा मुंडे म्हणाल्या, आता किती वर्षे राहिली आहेत मला आज माहिती नाही. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. पण मी तुमचा स्वाभिमान मरू देणार नाही २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय मिळवू देणार तुमची इच्छा असेल तर मला कोणीही हटवू शकणार नाही. गोपीनाथ गड तीन महिन्यात बनविला. आता इतकी वर्षे झाली. पण सरकारला गोपीनाथ मुंडे यांच स्मारक उभारता आलं नाही अशी टीका करत आता ते स्मारक उभारूही नका असे सरकारला सांगते असे म्हणत आता जर काही बनवायचं असेल तर शेतकऱ्यांच कष्ट दूर करणारी जादूची कांडी बनवा, ऊस तोड कामगारांना न्याय मिळेल असे काही तरी बनवा आणि तेच गोपीनाथ मुंडे यांच स्मारक असेल असेही यावेळी जाहिर केलं.

तसेच भाजपामध्ये होत असलेल्या घुसमुटीवर पंकजा मुंडे यांनी या सभेत भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या, माझ्याकडे आज काही नाही. फक्त नीतीमत्ता आहे. गोपीनाथ मुंडे यांची लेक म्हणून असलेली हिंमत आणि तुमच्यावर असलेला विश्वास याच गोष्टी माझ्याकडे आहे. माझ्यावर रोज आरोप होतात. कोणी म्हणतं या पक्षात चालल्या, त्या पक्षात चालल्याचं कार्यकर्त्ये विचारत आहेत. पण ह्या पंकजा मुंडे हीची निष्ठा इतकी लेचीपेची नाही असं सांगत आपण भाजपामध्येच राहणार असल्याचं एकप्रकारे स्पष्ट केलं.

शेवटी पंकजा मुंडे म्हणाल्या, काही जणांना पदं देऊन त्यांची निष्ठा मिळवता आली नाही. पण आज माझ्याकडं पद नसताना निष्ठा कशी मिळवायची हे इथं जमलेल्या जनसमुदायाला विचारा असे सांगत दरवेळा इथली लोक एक स्वप्न पाहतात. ती तुटतात पण प्रत्येक वेळी पुन्हा नवी स्वप्न पुन्हा जन्म घेत आहेत. जिथे ब्रम्हा विष्णू महेश या त्रिमुत्रींना त्यांच्या युध्दात पराभव स्विकारावा लागला. देवीलाही असंख्य असूरांबरोबर लढावं लागलं असेही स्पष्ट केले.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *