Breaking News

नोकिया देणार इतक्या कर्मचाऱ्यांना नारळ; हे दिल आहे कारण ? गूगल नंतर नोकिया करणार 'इतके' कर्मचारी कपात

कोविड पासून संपूर्ण देशावर मंदीचं सावट आहे. त्याचा परिणाम मोठ्या कंपन्यांमध्ये सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या कपात होणाऱ्या स्वरूपात दिसून येतो. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कंपन्या हजारो लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. या यादीत जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल ते फेसबुकची मूळ कंपनी मेटाचा सुद्धा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या या यादीत आता नोकियाचंही नाव जोडलं जाणार आहे. कंपनीनं आपल्या १४ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची तयारी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार नोकियानं गुरुवारी सांगितलं की उत्तर अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये ५G उपकरणांच्या मंद विक्रीमुळे तिसऱ्या तिमाहीत विक्रीत मोठी घट झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, विक्रीत २० टक्क्यांनी घट झाली आहे आणि या घसरणीनंतर नव्या कॉस्ट सेव्हिंग प्लॅनअंतर्गत १४ हजार नोकऱ्या कमी केल्या जातील. नोकियाच्या ले-ऑफच्या या निर्णयामुळे, कंपनीच्या सध्याच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांची संख्या ७२ हजारांपर्यंत कमी होईल.

उत्तर अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत कंपनीसमोर अनेक आव्हानं असताना नोकियाने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपातीचा हा मोठा निर्णय घेतला आहे. टाळेबंदी आणि इतर खर्च-बचत उपायांद्वारे, कंपनीनं २०२६ पर्यंत ८०० मिलियन युरो (८४२ मिलियन डॉलर्स) आणि १.२ बिलियन युरोच्या दरम्यानची बचत साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेक्का लुंडमार्क यांनी तिसऱ्या तिमाहिदरम्यान आलेल्या आव्हानांना स्वीकारलं आणि चौथ्या तिमाहिदरम्यान नेटवर्क व्यवसायात अधिक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कंपनीमध्ये १४ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीबद्दल त्यांनी माहिती दिली. बाजारात असलेली अनिश्चितता तसेच दीर्घकालीन नफा सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

सात महिन्यातील कच्चे तेल एकट्या एप्रिल महिन्यात रशियाकडून आयात ७ महिन्यातील उच्चांक ठरावा इतके कच्च्या तेलाची आयात

खाजगी रिफायनर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि Rosneft-समर्थित Nayara Energy यांनी एप्रिल २०२४ मध्ये रशियाकडून सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *