Breaking News

मुंबईकरांना मोठा दिलासा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात

महानगर गॅस लिमिटेडने एक मोठा निर्णय घेत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे. नवीन दर सोमवारपासून लागू झाले आहेत.

मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात ३ रुपयांची तर पीएनजीच्या दरात २ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे मुंबईत आता ७६ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळेल. तर पीएनजी ४७ रुपयांना मिळेल. मोठ्या संख्येने वाहनधारक सीएनजी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे मुंबईतही अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर केला जातो. महानगर गॅस लिमिटेडने घेतलेला दरकपातीचा निर्णय मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडचा दर कपातीचा आदेश १ ऑक्टोबर २०२३ च्या मध्यरात्री आणि २ ऑक्टोबर २०२३ च्या सकाळपासून लागू होईल. याआधी एप्रिल महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत ८ रुपये आणि पीएनजीच्या दरात ५ रुपये प्रति एससीएम कपात केली होती. दर कपातीनंतर मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सीएनजीची किंमत ७९ रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच वेळी, पीएनजीची किंमत ४९ रुपये झाली होती. कपातीपूर्वी, शहरात सीएनजीची किंमत ८७ रुपये प्रति किलो होती. तर पीएनजीची किंमत ५४ रुपये प्रति एससीएम होती.

महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर ५० टक्के आणि डिझेलवर २० टक्के बचत करत आहेत. पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मानला जातो.

Check Also

हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून डिव्हीडंड जाहिर नफा २ टक्क्याने घसरला

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने बुधवारी चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) नफ्यात घट नोंदवली. “(मार्च २०२४) तिमाहीत रु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *