Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधूंच्या कादंबरीतील ‘झिपऱ्या’ लवकरच चित्रपटगृहात झळकणार

मुंबई : प्रतिनिधी

मराठी साहित्य इतकं प्रगल्भ आणि विपुल आहे. यामुळे काही दिग्दर्शकांना नेहमी मराठी साहित्य खुणावत असतं. त्यामुळेच अशा साहित्यकृतींवर आधारित सिनेमांची निर्मिती होत असते. विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नांव आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ‘झिपऱ्या’ ही त्यानी लिहिलेल्या पैकी एक कादंबरी आहे. आता या कादंबरीवर ‘झिपऱ्या’ हा मराठी चित्रपट येत आहे.

अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन, वेशभूषा हे तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत, तर उत्कृष्ट चित्रपट आणि नृत्यदिग्दर्शन नामांकनं जाहीर झालेले आहेत. २२ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘झिपऱ्या’चा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘झिपऱ्या’ च्या पोस्टरवर रेल्वे स्टेशनच्या फलाटावर बसलेली तीन मुलं दिसतात. एक जण जिन्यात बसून कशाची तरी वाट बघतोय, तो नेमका कशाचा शोध घेतोय हे कळायला मार्ग नाही, एक आपल्याच मस्तीत उभा ठाकलेला आहे, एक जण आपल्याच गुर्मीत टशन देतोय, त्याच्या हातात बूट पॉलिशची साधने दिसत आहेत. हे तिघे कोण आहेत? रेल्वे स्थानकावर काय करत आहेत? या प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे. ज्यांनी ‘झिपऱ्या’ कादंबरी वाचली आणि ज्यांनी नाही वाचली अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांची या पोस्टरमुळे उत्कंठा वाढली आहे.

अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारीत पटकथा आणि चित्रपटाचं दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केलं आहे. या सिनेमात चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर आदी कलाकार आहेत. या चित्रपटाला समित सप्तीसकर, ट्रॉय-अरिफ यांनी संगीत दिलं असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *