Breaking News

भविष्यकाळातील कोणत्याही निवडणूकीत भाजपा-शिवसेना युती नाहीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबरील युती कायम रहावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूका लढविण्याचा निर्धार कायम असतानाच यापुढे भविष्यातील कोणत्याही निवडणूकीत युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेने दरम्यान युती होणार नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. तेथील स्थानिक राजकिय परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच शिवसैनिकांची भूमिकाही जाणून घेत आहेत. दरम्यान, शिवसेनेबरोबरील ताणलेले संबध पूर्वरत करण्यासाठी भाजपकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उध्दव ठाकरे यांची युतीच्या अनुषंगाने भेट घेणार होते. त्यासाठी वेळही मागितली होती. मात्र मातोश्रीवरून त्यांना भेटीची वेळच देण्यात आली नसल्याने त्यांचा मुखभंग झाला.

त्यामुळे मुनगंटीवार यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याची भाजपची इच्छा आहे. मात्र त्यासाठी त्यांचीही तयारी हवी असे वक्तव्य करत भाजपकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची एकप्रकारे कबुली दिली. भाजपच्या या प्रयत्नांना शिवसेनेकडून प्रतिसाद दिला जातो का? याबाबत राजकिय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली होती. मात्र अखेर उध्दव ठाकरे यांनी विधानसभा आणि लोकसभा या दोनच निवडणूका नाही तर कोणत्याच निवडणूकीत भाजपशी युती करणार नसल्याचे ट्वीटरच्या माध्यमातून आज शुक्रवारी दुपारी जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेबरोबरील संभावित भाजपच्या युतीची शक्यता संपुष्टात आली आहे.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *