Breaking News

‘सिंघम ३’ मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

‘सिंघम ३’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिंघम 3’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येत आहेत. आता या सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

‘सिंघम ३’ या सिनेमात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. आता अभिनेत्रीने या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक आऊट केला आहे. फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर करत करीनाने लिहिलं आहे,”सैन्यात सामील होण्याची आता पुन्हा वेळ आली आहे”. या पोस्टरमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग पाहायला मिळत आहे.

करीनाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बेबोच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अॅक्शन मोडमध्ये पुन्हा एकदा, आली रे आली अवनी बाजीराव सिंघम आली, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, कमाल पोस्टर, बेबोचं कमबॅक, क्वीन अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

रोहित शेट्टीने करीनाचा लूक शेअर करत लिहिलं आहे,”सिंघम’ची खरी ताकद… अवनी बाजीराव सिंघम. २००७ मध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ७’, ‘सिंघम रिटर्न’ असे ब्लॉकबस्टर सिनेमे आम्ही दिले आहेत. आता चौथ्या सिनेमासाठी सज्ज आहोत. या १६ वर्षांत काहीही बदललेलं नाही. बेबो त्यावेळी जशी होती साधी, सरळ, प्रेमळ आणि मेहनती तशीच आजही आहे”. ‘सिंघम 3’ या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

https://x.com/KareenaK_only/status/1722246387218223352?t=geiIvGuaEVwwsQq8Jhc90A&s=08

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक

आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *