Breaking News

अंडी : आरोग्याला काय आहे फायदेशीर; उकडलेलं अंड की ऑम्लेट

आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी खाणे पसंत करतात. अंडी चवदार असण्यासोबतच हेल्दीही आहे. यात व्हिटामिन्स, आर्यन आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मात्र आजही लोकांना असा प्रश्न पडतो की उकडलेले अंडे चांगले की अंड्याचे ऑम्लेट. काहींच्या मते उकडलेले अंडे आरोग्यासाठी फायदेशीर असते तर काहींच्या मते अंड्याचे ऑम्लेट चांगले असते. जाणून घेऊया…

उकडलेले अंडे

उकडलेले अंडे हा नाश्त्याचा एक सोपा प्रकार आहे. यात खास तयारीची गरज नसते. उकडलेले अंडेही पौष्टिक असते. यात खालीलप्रकारे पोषक तत्वे असतात.

प्रोटीन – अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. एका उकडलेल्या अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीन असते.

व्हिटामिन डी – अंड्यामध्येही व्हिटामिन डी आढळते. एका उकडलेल्या अंड्यात ६ टक्के व्हिटामिन डी असते.

कोलीन – अंडे कोलीनचा चांगला स्त्रोत आहे जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय फायदेशीर आहे.

ल्यूटिन आणि जेक्सँथिन – हे दोन अँटीऑक्सिडंट अंडयामध्ये आढळतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे.

ऑम्लेट खाण्याचे फायदे

नाश्त्यामध्ये अनेकांना ऑम्लेट खाणे पसंत आहे. ऑम्लेट हे चवीला अतिशय सुंदर लागते तसेच हेल्दीही असते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे ऑम्लेट बनवू शकता. यात तुम्ही भरपूर भाज्या, चिकन, तसेच दुसऱ्या गोष्टी टाकून बनवू शकता.

फायबर – भाज्यांनी भरपूर असलेले ऑम्लेट हा फायबरचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे पाचनसंस्था सुरक्षित राहते. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी राहण्यासही मदत होते.

आर्यन – हे अतिशय आवश्यक खनिज आहे जे लाल रक्तपेशी बनवण्यासोबतच संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करते. पालकने भरलेले ऑम्लेट आर्यनचा चांगला स्त्रोत आहे.

व्हिटामिन सी – भाज्यांनी भरलेले ऑम्लेट हा व्हिटामिन सीचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. व्हिटामिन सी अँटी ऑक्सिडंट म्हणूनही काम करते.

हेल्दी फॅट – अंड्यामध्ये हेल्दी फॅट असते. यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचा समावेश आहे. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *