Breaking News

महाराष्ट्रातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करायचाय, मग ही यादी बघाच राज्य सरकारकडून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनमुळे कामगार, विद्यार्थी, पर्यटक किंवा यात्रेकरू म्हणून परराज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात अडकून पडला असाल तर घाबरू नका. राज्य सरकारने तुमच्यासाठी राज्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द केली असून तुमच्या जिल्ह्यातील नेमक्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोनवरून संपर्क साधता येणार आहे. तसेच त्यांच्याकडील पुढील गोष्टींचे मार्गदर्शन घेवून त्यानुसार माहिती द्या.
मात्र जर तुम्ही परराज्यात अडकला असाल तर स्थानिक नोडल अधिकाऱ्यांशी पहिल्यांदा संपर्क करा. त्यानंतरच तुम्हा ज्या जिल्ह्यात जायचे आहे. तेथील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करा. स्थानिक पातळीवर अडचण आल्यास मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक असून [email protected] हा ईमेल देण्यात आला असून यावरही आपण संपर्क साधून मदत मागू शकता.

List of nodal officers for help

 

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *