Breaking News

नितेश राणेंचे “त्या” वक्तव्याने विधानसभेत भाजपा आली अडचणीत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामनेः सभागृहाचे कामकाज तहकूब

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्यावं-म्यावं असा दुसऱ्यांदा बोलल्यावरून शिवसेनेचे नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी नितेश राणे यांना निलंबन करण्याची मागणी केली. या मुद्यावरून भास्कर जाधव आणि भाजपाच्या सदस्यांमध्ये तुंबळ शाब्दीक चकमकी होवून सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील विरोधक समोरासमोर आल्याने गोंधळाची परिस्थिती …

Read More »

केंद्रीय मंत्री नारायण राणें म्हणाले, सत्तेचा गैरवापर कराल तर याद राखा संतोष परबवरील हल्ला प्रकरणी पोलिसांनी केली होती नीतेश राणेंची चौकशी

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सध्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीत वातावरण तापलेले असताना काही दिवसांपूर्वी संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नीतेश राणे यांची पोलिसांनी चौकशी केली. परंतु आता त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत असून ही शक्यता गृहीत धरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपले पुत्र तथा भाजपाचे …

Read More »

मागील आठवड्यात या कंपन्यांची बाजार भांडवलात आघाडी शेअर बाजारात टाटा, रिलायन्स बाजार भांडवलात सर्वात पुढे

मराठी ई-बातम्या टीम शेअर बाजारात मागील आठवड्यात देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १,०१,१४५.०९ कोटी रुपयांनी वाढले. या तेजीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आघाडीवर होते. मागील आठवड्यात देशातील शेअर बाजारात मोठा चढ-उतार पहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर …

Read More »

राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ ओमायक्रॉनचे ३१ तर कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळून आले

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत होते. तर ओमायक्रॉनचे रूग्ण एकदं-दुसरा आढळून येत होता. परंतु नववर्ष स्वागतानिमित्त खरेदीच्या आणि अन्य कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरीकांकडून काहीप्रमाणात निष्काळजीपणा होत आहे. यापार्श्वभूमीवर आज कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळले असून यापैकी सर्वाधिक रूग्ण ८९६ …

Read More »

नवीन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स, वाहने, स्टीलच्या किंमती वाढणार ६ ते १० टक्क्याने वाढ होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्षाची सुरुवातच आता महागाईने होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, स्टीलच्या किंमती वाढणार आहेत. यासोबतच फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स उत्पादने आणि लॉजिस्टिकसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांनी या वर्षी उत्पादनांच्या किमती ३ ते ५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आता पुढील महिन्यापासून किंमती ६ ते १० …

Read More »

अजित पवारांकडून मलिक-नितेशला कानपिचक्या तर नारायण राणेंना टोला सिंधुदूर्ग दौऱ्यात काँग्रेस, शिवसेनेच्या मदतीला राष्ट्रवादी

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीसाठी सिंधुदूर्गात आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या ट्विटर युध्दावरून कानपिचक्या देत त्या ट्विटरवरू कोंबड्याला मांजर करून किंवा कशाला काय म्हणून माझ्या कोकणातील विकासकामांचे प्रश्न सुटणार आहेत का? अशी टोचणी देत कोकणातील मतदारोनो विचारपूर्वक …

Read More »

गुंतवणूकदारांनो, नव्या वर्षातील या नव्या आहेत गुंतवणूकीच्या संधी फेब्रुवारीपर्यंत येणार ४५ कंपन्यांचे आयपीओ

मराठी ई-बातम्या टीम या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षही आयपीओच्या दृष्टीने सुपरहिट ठरू शकते. फेब्रुवारीपर्यंत ४५ कंपन्या त्यांचे आयपीओ आणण्याची शक्यता आहे. भांडवल उभारण्यासाठी आयपीओ आणत असलेल्या कंपन्यांमध्ये स्टार्टअपचाही समावेश असेल. वर्ष २०२२ मध्ये एलआयसीचा आयपीओ सर्वात मोठा असेल. मात्र, हा आयपीओ नक्की कधी येईल हे निश्चित झालेले नाही. मार्चपूर्वी आयपीओ आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आतापर्यंत याचे …

Read More »

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी सांगितले की… विधानसभा अध्यक्ष निवडणूकप्रश्नी मविआच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मराठी ई-बातम्या टीम मागील ८ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदाकरीता सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवशेनातच निवडणूक घेण्याच्या हालचाली महाविकास आघाडीने सुरु केल्या. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत सदर निवडणूकीच्या अनुषंगाने माहिती …

Read More »

या महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले उपमुख्यमंत्र्यांसह या तीन मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य व्हिआयपी ड्रायव्हिंग ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पहिलीच जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम सध्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसत आहेत. परंतु ड्रायव्हिंग क्षेत्राततही आता महिला काम करण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत एसटीत ड्रायव्हर म्हणून, रिक्षा चालक महिलांची संख्या वाढत आहे. परंतु व्हिआयपी असलेल्या मंत्र्यांच्या गाडीच्या सारथ्य करण्याची जबाबदारी एका महिला पोलिसांने पहिल्यांदाच पार पाडल्याचे दिसून आले असून …

Read More »

पडळकरांच्या आरोपानंतर अजित पवार म्हणाले… नेमकी बाजू काय हे जाणून घेणार पण प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे राज्य सरकारची जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम विधान परिषदेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्यावर सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, हे गंभीर असून राज्यातील प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. …

Read More »