Breaking News

या महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले उपमुख्यमंत्र्यांसह या तीन मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य व्हिआयपी ड्रायव्हिंग ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पहिलीच जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम

सध्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसत आहेत. परंतु ड्रायव्हिंग क्षेत्राततही आता महिला काम करण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत एसटीत ड्रायव्हर म्हणून, रिक्षा चालक महिलांची संख्या वाढत आहे. परंतु व्हिआयपी असलेल्या मंत्र्यांच्या गाडीच्या सारथ्य करण्याची जबाबदारी एका महिला पोलिसांने पहिल्यांदाच पार पाडल्याचे दिसून आले असून विशेष म्हणजे या गाडीमध्ये राज्याचे एक नव्हे तर तब्बल तीन मंत्री विराजमान होते.

यासंदर्भातील माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनीच यासंदर्भात एक फेसबुकद्वारे एक पोस्टद्वारे ही माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि स्वत: गृह राज्यमंत्री सतेज बंटी पाटील हे आज सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीसाठी सिंधूदुर्गमध्ये पोहोचले होते. त्यावेळी पोलिस दलातील महिला पोलिस काँन्सटेबल तृप्ती मुळीक यांनी या तीन मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केले.

मुळीक या कोल्हापूर मुळच्या अंबप पाडली या गावच्या असून त्यांनी नुकतेच व्हिआयपी ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांची पहिलीच ड्युटी अजित पवारांच्या गाडीने प्रवास करणाऱ्या तीन मंत्र्यांच्या वाहनावर लावण्यात आली. तसेच तृप्ती मुळीक या सध्या सिंधुदुर्ग येथेच पोस्टींगला आहेत.

तसेच या पोस्टच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी तृप्ती मुळीक यांना पुढील वाटचालीला शुभेच्छाही दिल्या. दरम्यान अजित पवार यांनी सिधुदूर्ग येथील आपल्या नियोजित कार्यकामात पोहचल्यानंतर या महिला पोलिस काँन्सटेबलचे कौतुकही केले.

सतेज पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तृप्ती मुळीक यांना लहानपणापासूनच ड्रायव्हिंगची आवड असून त्या आवडीतूनच त्यांनी पोलिस दलात दाखल झाल्यानंतर याच पध्दतीची नोकरी करणे पसंत केले. तसेच त्यांच्या व्हिआयपी ड्रायव्हिगचे प्रशिक्षण २३ डिसेंबरला पूर्ण केले असून  प्रशिक्षणानंतरही ही पहिलीच ड्युटी त्यांना लावण्यात आली होती. परंतु त्यांनी ती समर्थपणे पार पाडल्याचेही पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये आवर्जून उल्लेख केला आहे.

Check Also

बिल्कीस बानो: या मुद्यांच्या आधारे न्यायालयाने ठरविला गुजरात सरकारचा निर्णय अवैध

देशातील गोध्रा येथील जातीय दंगली दरम्यान बिल्कीस बानो या मुस्लिम गरोदर महिलेवर बलात्कार करून तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *