Breaking News

गुंतवणूकदारांनो, नव्या वर्षातील या नव्या आहेत गुंतवणूकीच्या संधी फेब्रुवारीपर्यंत येणार ४५ कंपन्यांचे आयपीओ

मराठी ई-बातम्या टीम

या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षही आयपीओच्या दृष्टीने सुपरहिट ठरू शकते. फेब्रुवारीपर्यंत ४५ कंपन्या त्यांचे आयपीओ आणण्याची शक्यता आहे. भांडवल उभारण्यासाठी आयपीओ आणत असलेल्या कंपन्यांमध्ये स्टार्टअपचाही समावेश असेल.

वर्ष २०२२ मध्ये एलआयसीचा आयपीओ सर्वात मोठा असेल. मात्र, हा आयपीओ नक्की कधी येईल हे निश्चित झालेले नाही. मार्चपूर्वी आयपीओ आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आतापर्यंत याचे मूल्यांकन व इतर प्रक्रिया सुरू आहे. आयपीओतून एलआयसी ८० हजार कोटी रुपयांवरून १ लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. यासोबतच ओला, बायजू, ओयो सारखे स्टार्टअप्सही बाजारात येण्याची तयारी करतील.

गेल्या तीन महिन्यांत तीन डझनहून अधिक कंपन्यांनी शेअर बाजार नियंत्रक सेबीकडे आयपीओ आणण्यासाठी कागदपत्रे सादर केली आहेत. यामध्ये अदानी विल्मर, गो फर्स्ट एअरलाइन्स, ड्रूम टेक्नॉलॉजी, स्नॅपडील यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. अदानी विल्मर आयपीओतून ४५०० कोटी तर गो फर्स्ट ३५०० कोटी रुपये उभारमार आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६३ कंपन्यांनी आयपीओतून १.२९ लाख कोटी रुपये उभे केले आहेत. याआधी २०१७ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ७५ हजार कोटी रुपये जमा झाले होते. पेटीएमने आतापर्यंतचा सर्वात मोठी आयपीओ आणला. यामधून पेटीएमने १८ हजार ३०० कोटी रूपये उभे केले. तर झोमॅटोने ९३७५ कोटी रुपये उभे केले होते. नुरेकाने उभारलेली सर्वात कमी रक्कम १०० कोटी रुपये होती. स्टार हेल्थने ७२४९ कोटी रुपये उभे केले .

शेअर बाजारातून २०२१ मध्ये आतापर्यंत सरासरी दोन लाख कोटी रुपयांचा २,०२,००९ कोटी रु. निधी उभारला असून २०२० मधील १,७६,९१४ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. महत्त्वाचे म्हणजे २,०२,००९ कोटींपैकी ५१ टक्के किंवा १,०३,६२१ कोटी रुपये ताज्या शेअर विक्रीतून उभारले आहेत. तर ९८,३८८ कोटी रु. ऑफर फॉर सेलमधून उभारण्यात आले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) म्युच्युअल फंड कंपनी SBI Mutual Fund आता आयपीओ (IPO) आणण्याची तयारी करत आहे. आयपीद्वारे कंपनी ७५०० कोटी रुपये उभारू शकते. म्युच्युअल फंड उद्योगातील हा सर्वात मोठा IPO असेल. यासंदर्भात बँकेच्या मध्यवर्ती मंडळाची कार्यकारी समिती मंजुरीसाठी तयारी करत आहे. एसबीआय फंड हाऊसमधील ६ टक्के हिस्सा विकण्याची शक्यता आहे.

Check Also

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *