Breaking News

वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार

आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ तीन निर्णय घेण्यात आले

दिवाळीपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक लोकानुनय करणाऱ्या निर्णयाची खैरात करत दिवाळी भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवाळीनंतर झालेल्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आदिवासी समाजाच्या योजनांच्या बाबत राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामास सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्यात आली. …

Read More »

युवक व महिलांना उद्योजकता प्रोत्साहनासाठी महाराष्ट्र चेंबर व एम.एस.एम.ई मंत्रालय अभियान राबवणार

महाराष्ट्रातील युवकांना व महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरित करून त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबविण्यासाठी एम.एस.एम.ई खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित …

Read More »

ऑक्टोंबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळणार

ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे लवकरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी …

Read More »

दीपक केसरकर यांचे आश्वासन, शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार आंदोलन मागे घेण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

घोषित शाळांतील शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि मुख्यमंत्री येत्या १५ नोव्हेंबर रोजी याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांनी सुरू असलेले आंदोलन थांबवावे, असे आवाहन …

Read More »

जयंत पाटील यांचा डॉ भागवत कराड यांना टोला, सरकार फक्त पत्रावर चालत नाही

मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे. औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचा उद्योग सुरू असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले. मराठवाड्यातील प्रकल्प मंजूर करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला असे वक्तव्य …

Read More »

अॅड प्रकाश आंबेडकरांची भीती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘त्या’ प्रतिज्ञांवर येणार बंदी

काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दिल्ली सरकारमधील आम आदमी पार्टीचे मंत्रीही हजर होते. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म स्विकारताना २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यासंबधी अट घालत त्याचे पठण करून घेतले होते, त्या प्रतिज्ञांचे पठण त्यावेळी करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाचा …

Read More »

सचिन पायलट म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्यानंतर काय झालं ते सर्वांनी पाह्यलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाक्याचा संदर्भ देत केली टीका

राजस्थान विधानसभेच्या निवडणूका झाल्यापासून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत गटामधील संदोपसंदी काही केल्या संपायला तयार नाही. मध्यंतरी तत्कालीन काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या संदोपसुंदीवर मार्ग काढण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची ऑफर अशोक गेहलोत यांना दिली. मात्र अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्विकारण्याची तयारी दाखविली …

Read More »

बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदेश

आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून परिसर सील करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पश्चिम येथील के. ईस्ट वॉर्ड येथे आज झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, भारती लव्हेकर सर्व विभागाचे अधिकारी आणि …

Read More »

अतुल लोंढेंचा आरोप, फडणवीसांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे. पण त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदांता व वेदांता-फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात …

Read More »