Breaking News

Editor

युक्रेनच्या चर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा पंतप्रधान डेन्यस स्मॅहल यांची माहिती

मागील तीन दिवसांपासून युक्रेनच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केलेल्या रशियाने आज युक्रेनच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तसेच महत्वाचा असलेल्या चर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पावरही रशियाने आज ताबा मिळविला असल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान डेन्यस स्मॅहल (Denys Shmyhal) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आज दिली. रशियाने दोन दिवसापूर्वी हल्ले …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मविआचा प्रभाग पध्दतीचा कायदा राज्यघटनेला छेद देणारा “एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य'' या संकल्पनेला बसतोय छेद

काही महिन्यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दती लागू करत सदस्य संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने नवा कायदा आणत विधिमंडळाची मान्यता घेतली. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नव्याने प्रभाग आणि वार्डांच्या सीमा नव्याने निर्धारीत करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या नव्या कायद्यामुळे राज्यघटनेतील “एक व्यक्ती-एक …

Read More »

रेल्वे जमिनीवरील झोपड्यांचा प्रस्ताव एसआरए योजनेनुसार असेल तरच पुनर्विकास गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ग्वाही

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्या हटवून त्या जागा पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाच्या अनुषंगाने दिल्लीत रेल्वे ट्रॅकच्या शेजारील रेल्वेच्या जमिनीवर वसलेल्या झोपडीधारकांना सध्या नोटीसा बजवाविण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने मुंबईतील रेल्वेच्या जमिनीवरही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेल्या आहेत. या झोपट्या हटविण्याच्या अनुशंगाने मुंबईतील रेल्वे …

Read More »

नवाब मलिकांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या ह्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय …

Read More »

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन राजीनामा देईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार

कथित मनी लॉडरींग आरोपावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्यावरील आरोप सिध्द होईपर्यत त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही असे धोरण महाविकास आघाडीने स्विकारत तसे जाहीरही केले. त्यावर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीवरून भाजपाने आज राज्याभर आंदोलन केले. तसेच राजीनामा घेईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा भाजपाच्यावतीने …

Read More »

आता १२ वीच्या वेळापत्रकात बदल: दोन विषयांचे पेपर मार्चऐवजी एप्रिल महिन्यात इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील ०५ मार्च आणि ०७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे ०५ एप्रिल आणि ०७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री …

Read More »

वकीलांच्या उपस्थितीत नवाब मलिकांच्या चौकशीस न्यायालयाची परवानगी पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या तीन मागण्यांना दिली मंजूरी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यत ईडीची कोठडी पीएमएलए न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना घरचे जेवण मिळावे, तसेच वकीलांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी करण्यात यावी, घरचे जेवण घेण्यास परवानगी आणि औषधोपचार घेण्यास परवानगी मिळावी याबाबत विनंती अर्ज आज मलिकांचे वकील अमित देसाई यांनी पीएमएलए न्यायालयात एका अर्जान्वये …

Read More »

संजय राऊत म्हणाले, मुंबईत १० पैकी ६ जण हिंदीत बोलतात उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत राऊतांचे वक्तव्य

राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेने प्रवेश केल्याने मुंबईत मराठीच्या मुद्यावरून शिवसेनेकडून घेण्यात येत असलेल्या भूमिकेत आता थोडासा बदल झाल्याचे दिसून येत असून आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गोरखपूर येथे आले आहेत. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबईत हिंदी …

Read More »

मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का? भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा  महाराष्ट्राचा अपमान असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा दाखवणार का, असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत …

Read More »

नवाब मलिक जिंदाबाद.. ईडी मुर्दाबाद.. मोदी सरकार हाय हाय…घोषणांनी परिसर दणाणला महाविकास आघाडीच्या युवक, महिलांनी मोदी भाजप आणि ईडीच्या नावाने घातला शिमगा

नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून …

Read More »