Breaking News

Editor

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार भारताला विकसित देश करण्यासाठी रेशनिंग धान्य बंद लोकांच्या घरोघरी जावून रेशनिंग धान्य घेण्याच्या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज भरून घेतला जातोय

देशाच्या स्वातंत्र्याला नुकतीच १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणून स्थापित करण्याचे धोरण जाहीर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी लोटत नाही. तोच देशातील सर्वसामान्य जनतेला सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रेशनिंग धान्य सेवेतून …

Read More »

भाजपा महिल्या नेत्याचा पराक्रम, घरात काम करणाऱ्या आदीवासी महिलेस शौचालय चाटायला… सीमा पात्रा ही झारखंडच्या भाजपा महिला पदाधिकारी आहेत

भाजपाने एकाबाजूला राजकारणाचा भाग म्हणून देशाच्या सर्वोच्च पदी आदीवासी महिला द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती बसविले आहे. तर दुसऱ्याबाजूला याच भाजपाच्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये आदीवासी बद्दल किती कणव आहे याचा पदार्फाश करणारी घटना नुकतीच उघडकीस आली. विशेष म्हणजे या भाजपाच्या महिला पदाधिकारी असलेल्या महिलेने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कामात चूक …

Read More »

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक इटलीत राहत्या घरी त्यांच्या आईचे निधन

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं इटलीत निधन झालं आहे. २७ ऑगस्टला पाऊलो मायनो याचं निधन शनिवारी झालं आहे. त्यांच्यावरती मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन माहिती दिली. सोनिया गांधी मागील आठवड्यात आपल्या आईंना भेटण्यास इटलीला गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत राहुल …

Read More »

अमोल मिटकरी म्हणाले, ज्यांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला…. आस्तिक की नास्तिक ठरविण्याचा अधिकार नाही

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नविधी लावताना म्हणण्यात येणाऱ्या मंत्राचा उच्चार करत त्याचा अर्थही सांगितला. त्यामुळे राज्यात वाद निर्माण होत अमोल मिटकरी यांच्यावर काही विशिष्ट समुदायाकडून टीकेची झोड उठविली. तसेच मिटकरी यांचा निषेधही करण्यात आला. यापार्श्वभूमीवर आजपासून गणेशोस्तवाला सुरुवात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, वर्षा बंगल्याच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना सोयी-सुविधा द्या ‘तोरणा’ बंगल्यात पोलिसांसाठी असलेल्या सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थान आणि मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी बंदोबस्तावर सातत्याने पोलिस आणि अधिकाऱ्यांना तैनात रहावे लागते. या पोलिसांना कपडे बदलण्यापासून जेवण आणि नैसर्गिक विधीकरीता वर्षा शेजारीच असलेल्या तोरणा बंगल्यात तात्पुरती पोलिसांची व्यवस्था करण्यात आली. मात्र  ‘तोरणा’ बंगल्यात पोलिसांच्या संख्याबळाच्या तुलनेत फारशा सोयी-सुविधा नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे मुख्यमंत्री …

Read More »

शिवसेना नेते दानवे म्हणाले, काही जणांना दुर्बुध्दी… एकनाथ शिंदे गटावर केली टीका

दिलेला शब्द पाळला नसल्याच्या कारणावरून भाजपा आणि शिवसेनेत वितुष्ट आले. त्यानंतर या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत होत्या. त्यातच आता शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाला वेगळे करत भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपाबरोबरच एकनाथ शिंदे गटावरही सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिंदे गटावर कधी गद्दार …

Read More »

अमोल मिटकरींच्या टीकेला उत्तर देताना शहाजी बापू म्हणाले, रोज नटून-थटून दाढीला… ते सोंगाड्या आहेत मात्र त्याचा काही उपयोग नाही

राज्यात एकीकडे सामाजिक आणि राजकीय नेत्यांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे राजकारण आणि राजकीय टोलेबाजी देखील दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’फेम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांना शिंदे गटातील जॉनी लिव्हर असल्याची खोचक टीका केली. मिटकरी यांच्या या …

Read More »

मंत्री नारायण राणे उध्दव ठाकरेंना म्हणाले, निवृत्तीची वेळ आलीय घरात गप्प बसावे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला दिले प्रत्युत्तर

शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून विशेषत: काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून नारायण राणे मुंबईसह कोकणात आले की शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही ते गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून …

Read More »

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्येक वेळी भाजपाबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपा नेते जाण्याच्या कृतीत कोणताही खंड पडला नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या …

Read More »

१५ लाखात पोलिसांना ५०० चौ.फु.चे घर मिळण्याचा मार्ग मोकळा बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत मिळणार हक्काची घरे: अवघ्या पाच दिवसात शासन निर्णय जारी

बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. बी. डी. डी. चाळींमध्ये १ जानेवारी २०११ पर्यंत वास्तव्यास असणाऱ्यांना …

Read More »