Breaking News

मंत्री नारायण राणे उध्दव ठाकरेंना म्हणाले, निवृत्तीची वेळ आलीय घरात गप्प बसावे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला दिले प्रत्युत्तर

शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून विशेषत: काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून नारायण राणे मुंबईसह कोकणात आले की शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही ते गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून टीका केली होती. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हणाले की, उध्दव ठाकरे यांची निवृत्तीची वेळ जवळ आलीय त्यामुळे त्यांनी आता घरात गप्प बसावे असा खोचक टोला लगावला.

राज्यातले सरकार हे कंत्राटी सरकार नसून कायमस्वरूपी सरकार आहे. कंत्राटी सरकार गणरायाने येण्यापूर्वीच रद्द केलं, अशी टीका करत उद्धव ठाकरे यांची निवृत्तीची वेळ जवळ आली आहे. यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हटले होते. मात्र, राज्यातले सरकार हे कंत्राटी सरकार नसून कायमस्वरूप सरकार आहे. कंत्राटी सरकार गणरायाने येण्यापूर्वीच रद्द केलं आणि कंत्राटदारांना हाकलून लावले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी घरात गप्प बसावे, अशी टीकाही त्यांनी केली.

अडीच वर्ष राज्यावर जे संकट होतं ते संकट दूर करून गणरायाचे आगमन झाले आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई मनपा आता १ वर्ष त्यांच्या हातात आहे. मात्र, त्यांच्याकडून मुंबईचं भलं होणार नाही. मुंबईला अगदी बकाल करून ठेवले आहे. टक्केवारीने मुंबईचे नुकसान केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मुंबई मनपात सत्ता परिवर्तन होईल. आम्ही मुंबई मनपावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली होती. घरात बसून मुख्यमंत्री पद हाताळता येत नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात किमान १० वर्षे महाराष्ट्र मागे गेला. आमदार आणि पक्षासोबत खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्रीपद गद्दारी करुन मिळवलं. आमदारांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. गणरायाच्या कृपेने महाविकास आघाडीचे सरकार गेलं आणि नवीन सरकार आलं, असेही ते म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता. तसेच, दुसऱ्या पक्षातून आमदार-खासदार चोरणं हाच यांचा एककलमी कार्यक्रम झालाय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती. यांचा एककलमी कार्यक्रम आहे की दुसऱ्या पक्षातून नेते आणा..आमदार-खासदार आणा. तेही पुरत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातून पक्षप्रमुख चोरा. स्वत:ला स्वप्नंही पडत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांची स्वप्नंही चोरा, अशी खोचक टीका असं उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Check Also

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published.