Breaking News

Editor

देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूका कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयाला ठाऊक महापलिका निवडणुकीबाबत संभ्रम कायम

मागील अडीच वर्षात राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली आहे. तसेच या महापालिकांवर सध्या प्रशासकांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गेलेले ओबीसींचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले …

Read More »

कोणाच्या सांगण्यावरून, पशुधन विकास अधिकाऱ्यासाठी विधान भवन राबतेय?

राज्यातील आमदाराच्या हक्काचे ठिकाण असलेले आणि विकासाच्यादृष्टीने चर्चेचे ठिकाण हे विधान भवन आहे. मात्र या विधान भवनात सध्या अवर सचिव दर्जाच्या एका पशुधन विकास अधिकाऱ्याला सहसचिवाचा दर्जा देत आणि सेवा निवृत्तीनंतरही खास पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा घाट घालण्यात येत असल्याची माहिती विधान भवनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. पदुम विभागातील अनिल शं.महाजन …

Read More »

किसान सभेचे २३वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोलेत

अखिल भारतीय किसान सभेचे २३वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोले, जि. अहमदनगर येथे आयोजित केले आहे. तीन दिवसीय अधिवेशनाची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी भव्य जाहीर सभेने होणार असून ओल्या दुष्काळ प्रश्नी राज्यव्यापी आरपार लढ्याचे नियोजन अकोले अधिवेशनात करण्यात येणार आहे. राज्य अधिवेशनापूर्वी किसान …

Read More »

तीन महिन्यात महाविकास आघाडीचे ‘हे’ निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलले

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सीबीआयला राज्यातील घडामोडींचा तपास आणि एफआयआर नोंदवण्यास महाविकास आघाडी सरकारने नाकारलेली परवानगी पुन्हा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारने मागील महाविकास आघाडी सरकारच्या किमान अर्धा डझन निर्णयांना स्थगिती दिली आहे किंवा ते रद्द केले आहेत. नवीन सरकार सत्तेवर येताच आधीच्या सरकारचे निर्णय …

Read More »

शरद पवारांनी केली पोलखोल, वसूलीला कोणी जात नसल्याने ती कर्जमाफी पुरंदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

मागील आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भू-विकास बँकेच्या कर्जदारांचे ९६४ कोटी रूपयांचे कर्ज माफ करत असल्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांनाही होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाची पोलखोल करत …

Read More »

राज्यपाल विरूध्द केरळ सरकार वादात न्यायालयाचा विजयन सरकारला दिलासा

पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात राज्यपालांच्या मदतीने भाजपाकडून खेळण्यात येत असलेल्या राजकारणाने आता केरळ राज्यातही प्रवेश केला आहे. केरळातील डाव्यांचे सरकार असलेल्या पिनराई विजयन सरकारने नियुक्ती केलेल्या ९ विद्यापीठांच्या कुलगुरुंना आज सकाळी ११.३० वाजेपर्यत राजीनामा देण्याचे आदेश राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी दिले. मात्र त्या विरोधात कुलुगुरूंनी राज्यपालांच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात …

Read More »

शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल, १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही

शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिंदे-फडणवीस सरकारची ही पहिलीच दिवाळी होत आहे. यापार्श्वभूमीवर शंभुराज देसाई यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. या वेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही, असा संकल्पच जाहिर केला. शंभूराज …

Read More »

दिवाळी दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु होताच निर्देशांक ६०० अंशानी वधारला

वर्षभर सुरु असलेल्या शेअर मार्केटची दर दिवाळी दिवशी एक तासाभरासाठी नव्याने ट्रेंडिंगची सुरुवात होते. या ट्रेडिंगला मुहुर्ताचा ट्रेडिंग म्हटले. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सिने अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेंडिंगला सुरुवात करण्यात आली. मुहुर्ताच्या ट्रेंडिंगची सुरुवात होताच शेअर मार्केटचा निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सकाळी अजय देवगण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही ही एक सामना खेळलो…

काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटात न्यायालयीन संघर्ष पाह्यला मिळाला. त्यापाठोपाठ ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरूनची लढाई ही न्यायालयात पोहोचली. मात्र न्यायालयाने शिंदे गटालाही परवानगी दिली. त्यानुसार ठाण्यात एकाबाजूला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तर दुसऱ्याबाजूला शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे …

Read More »

अखेर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डट यांच्या माघारीनंतर सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर यावर आलेल्या लिस ट्रॉस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अर्थमंत्र्यांनी जाहिर केलेल्या अर्थनीतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिझ ट्रॉस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील पंतप्रधान कोण? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पेनी …

Read More »