Breaking News

Editor

उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा, शिवसेनेशी गद्दारी केलात शेतकऱ्यांशी नको औरंगाबादेतील दौऱ्यात उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला हातचा घास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज रविवारी औरंगाबादेतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची …

Read More »

ठाकरे यांच्या दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांची टीका, शेतकऱ्यांसाठी फक्त २४ मिनिटे

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. या दौऱ्यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केलेली असताना, आता राज्याचे कृषीमंत्री तथा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही निशाणा साधला. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, हातातला आसूड सरकारला घाम फोडण्यासाठी वापरा औरंगाबादेतील दहेगाव, पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर उध्दव ठाकरे

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच राज्य सरकारकडूनही तातडीने मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंनी भरलेले आहेत. या शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन …

Read More »

नारायण राणे म्हणाले, ते माझे सहकारी होते, पण तेव्हा असे नव्हते उध्दव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नारायण राणेंनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदी तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत होते. त्यातील १० लाख नोकऱ्यांचा …

Read More »

रोहित पवार म्हणाले, पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं पण आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन काही काळ भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले. मात्र ते अल्पजीवी ठरले. त्यानंतर भाजपाने शिवसेनेत बंड घडवून आणत बंडखोर शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केले. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष …

Read More »

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाचा तो फुसका बार काही केल्या वाजत नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यातील मंत्री गिरीष महाजन यांनी वक्तव्य करत शिवसेनेतील आणखी काही नेते आणि आमदार शिंदे गटात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, पण त्याचं अजून मंडळांना परवानग्या देणंच सुरूय शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं कोणीही बोलत नाही

मान्सूनचा कालावधी संपलेला असला तरी राज्यातून मान्सून पूर्णत: गेलेला नाही. त्यातच परतीचा पाऊसही राज्यातील अनेक भागात अद्यापही थैमान घालत आहे. त्यातच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच दिवाळी सण निर्बंधमुक्त पध्दतीने साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्यातील जनतेला १०० रूपयात शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा शिधा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत …

Read More »

मुनगंटीवारांची ग्वाही, अनुदान उपलब्‍ध होण्‍याची वाट न पाहता दावा मंजूर करणार

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसानग्रस्‍त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्याने अनुदान उपलब्ध होण्याची वाट न पाहता आता अशा प्रकरणात तात्काळ दावा मंजूर करता येणार आहे. संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या …

Read More »

मोदींनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, वर्षभरात ७५ हजार नोकऱ्या

देशातील ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. तसेच पुढील १८ महिन्यात १० लाख नोकऱ्या देण्याची घोषणानाही पंतप्रधानांनी केली. यापार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री …

Read More »

पडळकर यांच्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, भाजपाचा प्रयत्न नाही राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल

भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर लवकरच भाजपाचा झेंडा असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही भाजपाचा झेंडा लागणार असल्याचे वक्तव्य करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वक्तव्याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच …

Read More »