Breaking News

दिवाळी दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु होताच निर्देशांक ६०० अंशानी वधारला

वर्षभर सुरु असलेल्या शेअर मार्केटची दर दिवाळी दिवशी एक तासाभरासाठी नव्याने ट्रेंडिंगची सुरुवात होते. या ट्रेडिंगला मुहुर्ताचा ट्रेडिंग म्हटले. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सिने अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेंडिंगला सुरुवात करण्यात आली. मुहुर्ताच्या ट्रेंडिंगची सुरुवात होताच शेअर मार्केटचा निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

सकाळी अजय देवगण यांनी मुहुर्ताच्या ट्रेडिंगची सुरुवात बेल वाजवून करण्यात आली. त्यानंतर एक तास भर ट्रेंडिंग होत राहिले. या ट्रेडिंगमध्ये जवळपास शेअर खरेदीसाठी ग्राहकांनी सुरुवात केली. त्यामुळे एका तासातच निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे दिसून आले.

हिंदू कॅलेंडरप्रमाणे संवत २०७९ च्या शुमारंभाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे नोंदणीकृत असलेल्या ३० शेअरमध्ये ६३५.१२ वाढ होत ५९ हजार ९४२.२७ वर पोहोचला. तर निफ्टीच्या शेअरमध्ये २०० अंशाची वाढ होत १७ हजार ७५० वर पोहोचला. यामध्ये टेलिकॉम, बँकिंग, औद्योगिक, ऊर्जा आदी कंपन्यांच्या शेअरचा सहभाग होता. त्याच सवंत २०७९ मध्ये ज्या नव्या दलालांनी आपली खाती सुरु केली. त्यांच्याकडून शेअर खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.

सकाळी एक तासासाठी मुहुर्ताची ट्रेंडिग झाल्यानंतर दिवसभरासाठी शेअर बाजार बंद ठेवण्यात आला. दैनंदिन पध्दतीने शेअरची खरेदी-विक्री उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहे.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *