Breaking News

Editor

वित्त विभागाने पैसे न दिल्याने बालकांना आणि महिलांना पोषण आहार नाही महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती : विरोधकांचा सभात्याग

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडीतील बालकांना आणि गर्भवती महिलांना पोषण आहार दिला जातो. मात्र राज्याच्या वित्त विभागाने पुरेसे पैसे दिले नसल्याने मागील काही दिवसांपासून पोषण आहार बंद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. परंतु आता पुरवणी मागण्यांमध्ये ४०० कोटी रूपये मागण्यात आले. मात्र …

Read More »

वीज चोरीच्या आदेशाबाबत औरंगाबाद पोलिस अनभिज्ञ गृहविभागाच्या आदेशाबाबत पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना माहितीच नाही

औरंगाबाद : प्रतिनिधी वीज चोरी संदर्भात प्रथम खबरी अहवाल देण्याकरता औरंगाबाद जिल्ह्यातील ५पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील सिडको आणि छावणी तर ग्रामीण भागातील चिकलठाणा, गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्यांचा समावेश आहे. हे आदेश गृृह विभागाने २८ फेब्रूवारीला जारी केले आहेत. याबाबत पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि पोलिस …

Read More »

जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. डिग्गीकर यांच्यासाठी नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर विशेष प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी चार सनदी …

Read More »

कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी सभागृहात ठेवणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने आतापर्यंत ३७ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून शक्य झाले तर या सर्व शेतकऱ्यांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, अशी ग्वाही सभागृहाचे नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. २००८-०९ मध्ये …

Read More »

अखेर आमदार परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास प्रवेशबंदी शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याला यश

मुंबई: प्रतिनिधी सैनिकांच्या पत्नींच्या संदर्भात अपशब्द काढणारे अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची कारवाई रद्द करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाला यश आले असून परिचारक यांना तूर्तास विधान परिषदेच्या सभागृहात येण्यास बंदी घालण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी …

Read More »

सातवा वेतन आयोगामुळे २१ हजार कोटींचा अतिरिक्त भार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी, निमशासकीय व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे शासकीय तिजोरीवर दरवर्षी २१ हजार ५३० कोटींचा अतिरिक्त भार पडेल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी उपस्थित …

Read More »

भुजबळांवर उपचार होण्यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री राहीलेले छगन भुजबळ हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील आरोपावर निर्णय कधी होईल तेव्हा होईल. सध्या भुजबळ हे आजारी असून त्यांच्या शरीरातील हेमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच त्यांना इतर काही त्रासही होत आहे. मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी राहीलेल्या व्यक्तीला सार्वजनिक रूग्णालयात दाखल करण्यात येते. तसेच …

Read More »

औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्नी पुन्हा एकदा बैठक घेणार विरोधकांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्नी स्थानिक नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला असल्याबाबतचा मुद्दा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपस्थित करत याप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी विधानसभेत केली. त्यावर औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर लवकरच पुन्हा एकदा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन देत …

Read More »

जनावरांच्या लसप्रश्नी विरोधकांचा सभात्याग पदुम मंत्री महादेव जानकर असमाधानकारक उत्तर दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २कोटी १० लाख शेतीपयोगी जनावरांना लाळ-खुरकूत रोग होवू नये यासाठी लस देण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रश्नी पशु व दुग्ध संवर्धन मंत्री महादेव जानकर हे प्रश्नांशी संबधित नसलेली उत्तर देत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत सभात्याग …

Read More »

बदनामी झाल्याने एकनाथ खडसे यांची पुन्हा सरकारवर आगपाखड तर आमदारांवर आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी २५ ते ३० वर्षाच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र मंत्री पदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची अँण्टी करप्शन, सीआयडी, लोकायुक्त मार्फत चौकशी केली. मात्र त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जनतेसमोर नाथाभाऊ कसा नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळ आरोप …

Read More »