Breaking News

“नाईटलाईफ”चा घाट कोणाचे बालहट्ट पुरविण्यासाठी ? विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी
२६ जानेवारी पासून मुंबई मध्ये नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरीही मुंबईत बलात्काराच्या घटना थांबत नाही. सोमवारी रात्री कुर्ला येथे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. एकीकडे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून मुंबईत बलात्कार, दरोडे, खून सारख्या घटना घडत असताना सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित असताना नाईटलाईफचा घाट कोणाचे बाल हट्ट पुरविण्यासाठी घेतला जातोय असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.
मरिन ड्राईव्ह,वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ आदी उच्चभ्रू वस्तीत नाईट लाईफ सुरु करण्याची सरकारची योजना असला तरीही २४ x ७ चालणा-या लाईफमुळे येत असले मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर ताण येणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचे संख्याबळ आताच कमी आहे. पोलिसांवर आधीच नियमित कामाचा ताण-तणाव आहे, त्यातच नाईट लाईफ सुरु केल्यास पोलिंसांच्या कामावर नक्कीच अधिक तणाव निर्माण होईल व त्याचा परिणाम मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर होईल अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यात कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्येचे सुरु असून कर्जबाजारी शेतक-यांचा सात बारा कोरा करण्याची भाषा करणारे आता मात्र शेतक-यांना वा-यावर सोडून नाईटलाईफ वाल्यांचे चोचले पुरविण्याठी प्राधान्य देण्यात महाविकास आघाडी मश्गुल असल्याची टीका त्यांनी केली.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *