Breaking News

इंडिया आघाडीच्या प्रमुख नेते पदाची धुरा मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे

देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, जनता दल युनायटेडचे नितीशकुमार, आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल, शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत, द्रमुकचे नेते यांच्यासह अनेक प्रमुख पक्षाचे नेते ऑनलाईनरित्या उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडीच्या अध्यक्ष कोण असावा यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि अन्य नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाला अनुमोदन दिले. तर इंडिया आघाडीच्या संयोजक पदाची जबाबदारी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी स्विकारावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र आघाडीच्या संयोजक पदाची गरज नसल्याचे सांगत नीतीशकुमार यांनी माघार घेतली.

इंडिया आघाडीच्या या ऑनलाईन बैठकीला मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अन्य एका महत्वाच्या नेत्याची अनुपस्थिती असल्याचे दिसून आले. बैठकीनंतर शरद पवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना म्हणाले, इंडिया आघाडीच्या अध्यक्ष पदाची धुरा मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. खर्गे यांच्या निवडीनंतर संयोजक पदाची जबाबदारीसाठी नीतीश कुमार यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र नीतीश कुमार यांनी आघाडीच्या अध्यक्ष पदानंतर संयोजक पदाची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच पुढील इंडिया आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगत आजच्या बैठकीत भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या पराभव करण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्याबाबत एकमत झाले. याशिवाय भाजपाला देशात सशक्त पर्याय उभा करण्यासाठी एकोप्याने निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगितले.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *