Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दिदी यांचे निधन वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला दादर येथील सुश्रुषा रूग्णालयात अखेरचा श्वास

आपल्या अभियानाच्या जोरावर मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Actress Sulochana Latkar) यांचं प्रदीर्घ आजाराने निधन (illness) झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी (Sulochana Didi) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी दिली होती. मात्र रुग्णालयामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी ५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील त्यांच्या घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क (Shivaji Park) स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi and Hindi Film Industry) सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांनी दिलेलं योगदान अमुल्य आहे. त्यांच्या बहुतांश भूमिका या चरित्र अर्थात बहिण, आई सारख्या चरित्र अभिनेत्री म्हणून अभिनय केला. सुलोचना लाटकर यांची सुलोचना दीदी या नावानेच कलाक्षेत्रामध्ये ओळख होती. सुलोचना यांची कारकीर्द कोल्हापुरात भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांच्या मार्गदर्शनाखाली फुलत गेली. चित्रपटाआधी जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल टाकलं. हा प्रयोग शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यासाठी झाला होता.

मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही केलेलं काम उल्लेखणीय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले स्टार राहिलेल्या दिलीप कुमार (DilipKumar), राज कपूर (Raj Kapoor) आणि देव आनंद (Dev Anand), प्राण (Pran) यांच्याबरोबरच राजेश खन्ना (Rajesh Khanna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), धर्मेंद्र (Dharmendra), राजेंद्र कुमार (Rajendra Kumar), शशी कपूर (Shashi Kapoor) यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

सुलोचना दिदी यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचनाताईंचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ असे चित्रपट केले.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *