Breaking News

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी सांगितला, सेंगोल शब्दाचे दोन अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेंगोल प्रतिष्ठापनेवरून साधला निशाणा

नव्या संसद भवनाचं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी तामीळनाडूच्या आदिनमकडून सेंगोल या राजदंडाचा स्विकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत तो लोकसभेत विधीवत अध्यक्षांच्या आसनासमोर प्रतिष्ठापित करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात आलं नाही म्हणून काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या आरोपांच्या फैरी होत आहेत. यासगळ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ तथा समाजवादी पार्टीचे खासदार कपिल सिब्बल यांनी सेंगोलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत तुम्ही सांगत असलेला सेंगोलचा अर्थ आम्हाला मान्य नाही असं कपिल सिब्बल यांनी ट्विट करत स्पष्ट केले. तसेच सेंगोलचे दोन अर्थही सिबल यांनी सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी नव्या संसदेचं उद्घाटन केल्यानंतर एक ट्वीट केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सेंगोलला ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचा समानार्थी शब्द मानतात. मात्र, तसं नाही. शक्य झाल्यास माझं म्हणणं ऐका. भारतात सत्तेचं हस्तांतरण त्या लोकांच्या इच्छेनं झालं ज्यांनी स्वतः हे संविधान दिलं. तर दुसरा अर्थ सिबल यांनी सांगताना पुरानातील देवी मीनाक्षी यांनी मदुराईच्या राजाला भेट दिलेलं सेंगोल हे राज्य करण्याच्या दैवी अधिकाराचं प्रतीक होतं असं सिब्बल यांनी स्पष्ट केले.

देशाला २८ मे रोजी नवं संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द करण्यात आला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.

जुन्या संसदेत लोकसभेत ५४३ खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत ८८८ खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची २५० ची क्षमता वाढवून ३८४ करण्यात आली आहे.

धर्मदंड आणि राजदंड यातील फरक काय

राजाने किंवा एखाद्या राजसत्तेने धारण केलेल्या दंडाला ‘राजदंड’ असे म्हणतात. मुख्यतः धर्मदंड व राजदंड असे दोन दंड अधिकार दर्शविण्यासाठी वापरले जात होते, किंबहुना वापरले जात आहेत. पृथ्वीवरील प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी साक्षात ईश्वराने या दोन सत्तांची पायाभरणी केल्याचे दाखले अनेक धर्मग्रंथांनी दिले आहेत. साम, दाम, दंड, भेद या उपायांपैकी दंड हा महत्त्वाचा आहे. दंड याचाच अर्थ शासन. त्या दंडाचे म्हणजेच शासनाचे प्रतीक म्हणून राजदंड स्वीकारण्याची परंपरा होती. हा राजदंड वस्तुतः खुद्द ‘राजाच’ अशी संकल्पना मनुस्मृतीत आढळते. हा दंड प्रजेचे शासन व रक्षण करतो. राजदंड हा मुख्यतः अधिकार व सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये राजा हा राजदंड धारण करतो अशा परंपरा अस्तित्त्वात आहेत, हे आपण इंग्लंडचा राजा चार्ल्स याच्या राज्याभिषेकाच्या वेळीही पहिले. युरोपियन इतिहासात कॅरोलिंगियन लोकांनी प्रथम काष्ठाचा राजदंड वापरला होता असे मानले जाते, पुढे रोमन राजांकडून त्याची पुनरावृत्ती झाली.

तर काही भारतीय धार्मिक ग्रंथानुसार धर्मदंड हा एखाद्या जात समुहाने किवा विशिष्ट वर्गातील जमातींकडून धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रमुख पदी नेमण्यात आलेल्या व्यक्तीच्या हाती धर्मदंड देण्यात येतो. तसेच त्या जात समुदायाच्या किंवा जमातीच्या नियमाच्या विरोधात वर्तन केल्यास धर्मदंड धारण करणाऱ्या व्यक्तीकडून जात-जमातीच्या विरोधात वर्तन करणाऱ्यास शासन देण्यात येते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *