Breaking News

Tag Archives: new parliament building inauguration

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी सांगितला, सेंगोल शब्दाचे दोन अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेंगोल प्रतिष्ठापनेवरून साधला निशाणा

नव्या संसद भवनाचं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी तामीळनाडूच्या आदिनमकडून सेंगोल या राजदंडाचा स्विकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत तो लोकसभेत विधीवत अध्यक्षांच्या आसनासमोर प्रतिष्ठापित करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात आलं नाही म्हणून काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी …

Read More »

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांचा पलटवार,… एकनाथ शिंदेंना स्मृतीभ्रंश झाला एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाची कावीळ झालीय

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडताना म्हणाले, मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा पलटवार,….तर जनताच जमालगोटा देईल स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त

दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना साधे निमंत्रणही न दिल्याच्या विरोधात विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तरीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका, …चिंता वाटायला लागली नेहरूंची विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना

राजधानी दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंजुरी दिलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या उद्घाटनादरम्यान वैदिक पध्दतीन संसदेच्या परिसरात हवन करण्याबरोबरच अनेक साधू-संताचा वावर संसदेत पाह्यला मिळाला. तसेच ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची …

Read More »

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनंतर राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, उद्घाटनाला…. एक फोटो ट्विट करतही मोदींवर काँग्रेसने सोडले टीकास्त्र

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळाही अवघ्या देशातील जनतेने पाहिला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाही व्यवस्था नाही तर…परंपरा ६० हजार कामगारांना रोजगार दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर …

Read More »

संसदेच्या उद्घाटनाला हजर राहणार की नाही शरद पवार यांनी केलं स्पष्ट… विश्वासात घेऊन निर्णयच घ्यायचा नसेल तर उद्धाटनाला जाऊ नये

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नसल्याने विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाने उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशात शनिवारी २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवन बांधताना विश्वास न घेतल्याचा आरोप …

Read More »

विरोधकांच्या बहिष्कारावरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मग ते लोकशाही विरोधी होतं का? मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढला

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं …

Read More »

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचे राष्ट्रपतींना निमंत्रणच नाही; विरोधक झाले आक्रमक अखेर ठरलं संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर विरोधकांचा बहिष्कार...

२८ मे रोजी देशाच्या नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. मात्र नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींनी करणे अपेक्षित असताना या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संसद भवनाचं उद्घाटन करणार असल्याने १९ विरोधी पक्ष आक्रमक झाले …

Read More »