Breaking News

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनंतर राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, उद्घाटनाला…. एक फोटो ट्विट करतही मोदींवर काँग्रेसने सोडले टीकास्त्र

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळाही अवघ्या देशातील जनतेने पाहिला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत अवघ्या दोन ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आलं नाही, असा दावा विरोधकांनी केला होता. यावरून देशभरातील २० पक्षांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे, असं म्हणत विरोधकांनी संयुक्त निवेदन जारी करून बहिष्कार जाहीर केला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. तर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील उद्घाटन होताच ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

“संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. तसंच, अनेकांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावाही विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे. त्यामुळे यावरून देशातील राजकारण तापले आहे.

तर काँग्रेसने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक मोठा फोटो ट्विट करत त्या फोटोत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची त्यांच्या बुटाच्या उंची इतकी दाखविली आहे.

 

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *