Breaking News

स्थानिकांचा विरोध डावलून अखेर बारसूत रिफायनरी प्रकल्पासाठी माती परिक्षण पोलिसांच्या सौम्य लाठिमारानंतरही स्थानिक विरोधकांचे ठिय्या आंदोलन

२०१४ साली राज्यात आणि केंद्रात भाजपाच्या नेत़ृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर कोकणातील नाणार येथे रिफानरी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा कऱण्यात आली. मात्र त्यास स्थानिक नागरिकांबरोबरच राजकिय नेत्यांचा विरोध वाढल्याने अखेर नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्दबातल करण्यात आला. त्यानंतर सदरचा प्रकल्प हा राजापूर तालुक्यातील बारसू सोलगावात स्थलांतरीत कऱण्यात आला. मात्र या भागातील स्थानिकांनी रिफानरी प्रकल्पास विरोध दर्शवित आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करत स्थानिकांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी आपले विरोधी आंदोलन थांबविण्यास नकार दिल्याने आंदोलनकर्त्यांच्या विरोधात आणि प्रचंड पोलिस फौज फाट्यात प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे माती परिक्षण करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

परिसरात माती परिक्षणासाठी आजपासून प्रस्तावित रिफायनरीसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. पण या परिसरात आता तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. रिफायनरी विरोधक महिला आंदोलकांनी पोलिसांची वाहनं आडवली आहेत. यामुळे मोठा तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी रिफायनरी विरोधी संघटनेच्या अध्यक्षांना मुंबईत अटक केली आहे. तर सर्वेक्षण सुरळीत पार पडण्यासाठी १८०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

राजापूर बारसू सोलगाव येथे सर्वेक्षणाच्या कामाला वेग आला आहेत. सर्वेक्षणाला लागणारे सामान घटनास्थळी दाखल झाल आहे. मात्र या सगळ्या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून येत आहे. विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रिफायनरी सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या सामानाची वाहतूक करणारे गाड्या बारसू परीसरात दाखल झाल्या. आज मंगळवारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढवण्यात आला आहे. तर या ठिकाणी वाटेतच आंदोलक महिला रस्त्यावरती आडव्या झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी समजावल्यानंतरही ग्रामस्थ घरी परतलेले नाहीत. यामुळे तणावाची परिस्थिती आहे. खारघर आणि पेण येथून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा येथे दाखल झाला आहे. एकंदरीत या सगळ्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी स्वतः लक्ष देऊन आहेत.

सोमवारी संध्याकाळपासूनच या सगळ्या परिसरात स्थानिक ग्रामस्थ एकत्र आले आहेत. आणि ते येथून हलण्यास तयार नाहीत. या सगळ्या प्रकरणात काही ग्रामस्थ आणि विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे. बारसू सोलगाव परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे.

राजापूरमध्ये सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनावर बोलण्यासाठी एकही राजकीय नेता समोर आलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातील आमदार राजन साळवी हे आहेत. तेही गेले काही दिवस या परिसरात दिसले नाहीत. सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बाबत ग्रामस्थांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *