Breaking News

शरद पवार भेटीसाठी उध्दव ठाकरे, संजय राऊत सिल्व्हर ओकवर; मात्र फोटो खुप काही बोलतो उध्दव ठाकरे, संजय राऊत एकाच रांगेत

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ठाकरे स्वत: पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहचले होते. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत व्यक्त केलेली नाराजी, तसंच फडतूस-काडतूस वादावरुनही ठाकरे यांना सुनावलेले खडे बोल या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं गेलं. ठाकरे-पवार भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते. दरम्यान या भेटीनंतर ठाकरे आणि राऊत या दोन्ही नेत्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले.

दोन्ही पद तीन पक्ष एकत्र येवून त्या संख्येमधून तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. अशावेळी असा राजीनाम्याचा निर्णय कोणी घेत असेल तर त्याबाबत इतर सहकारी पक्षांशी चर्चा करणं आवश्यक होतं. चर्चा न करता निर्णय घेतात, त्याचे दुष्परिणाम होतात. दुर्देवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही असे शरद पवार यांनी सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विधानसभाध्यक्ष पदाचा आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावरून चांगलेच फटकारले होते.

शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांना आणखी फडतूस आणि काडतूस या विधानवरुनही सुनावलं. पवार म्हणाले, मला जो महाराष्ट्र माहित आहे, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातील लोकांची मानसिकता माहित आहे, त्यात अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात. वैयक्तिक टिका-टिपण्णी नको. तुम्ही राजकीय मुद्दे घ्या, तुम्ही लोकांचे मुद्दे घ्या. त्यावर चर्चा करा. पण वैयक्तिक हल्ले होता कामा नयेत. अशा गोष्टी टाळायला हव्यात.

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदाणी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी यावरुन पवार यांनी घेतलेली वेगळी भूमिका यामुळे महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याची चर्चा आहे. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं होतं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं मत शिवसेना (ठाकरे गट) गटाकडून व्यक्त करण्यात आलं होतं. अशातच पवार-ठाकरे भेट झाली असल्याने या भेटीत या राजकीय विषयांवरही चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना उध्दव ठाकरे यांनी असा थेट राजीनामा न देता तो विधानसभेत आधी विश्वासमत ठरावाला उपस्थित रहावं आणि भाजपाच्या पडद्यामागील गोष्टीची पोलखोल करावी आणि त्यानंतर थेट राजीनामा द्यावा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी सूचना केल्याची चर्चा त्यावेळी राजकिय वर्तुळात सुरु होती. तरीही उध्दव ठाकरे यांनी स्वतःच निर्णय घेत राजीनामा दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून खाजगीत नाराजीही व्यक्त केली होती.

उध्दव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीचे फोटो आता बाहेर आले असून या फोटोत शरद पवार यांच्यासमोर ठाकरे आणि राऊत एकाच लाईनीत बसलेले दिसत आहेत. ऐरवी शरद पवार यांच्याकडे भेटायला गेलेल्या कोणत्याही पक्षाचा प्रमुख हा त्यांच्या जवळच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे किंवा समोर बसल्याचे आतापर्यंतच्या फोटोतून दिसून आले आहे. परंतु आजच्या या भेटी दरम्यानच्या फोटोत वेगळेच चित्र असल्याचे दिसून येत आहे.

बैठकी वेळीचा फोटोः 

Check Also

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *