Breaking News

भाजपा-शिंदे गटाच्या हिंदू मोर्चावरून संजय राऊतांची टीका, मोदी-शाहचं राज्य आल्यापासून… रामसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यादवांचा पद्मविभूषण पुरस्कार गौरव

आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाकडून आज रविवारी सकल हिंदू समाज या नावाखाली मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली. या मोर्चाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या अनुषंगाने संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील ८ वर्षापासून देशात मोदी-शाह यांचे राज्य हे. मोदी-शाह यांचे राज्य आल्यापासून हिंदूचा आवाज सातत्याने दाबला जात. तसेच तेव्हापासून हिंदूचा आक्रोश सुरु असल्याचा उपरोधिक टोला भाजपाला लगावला.

यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन शक्तिमान नेत्यांचं राज्य आहे. महाराष्ट्रात सुद्धा हिंदूंचं राज्य आलं, असं सांगण्यात येत आहे. तरीही काढलेला आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण, हिंदू समजले जाणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. म्हणून आक्रोश मोर्चा निघाला असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे, असा टोमणाही भाजपासह शिंदे गटाला राऊत यांनी लगावला.

तसेच संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित आक्रोश करत असून, न्याय मागत आहेत. मुलायमसिंह यादव यांनी राम सेवकांवर गोळ्या चालवल्या. मोदी सरकारने त्यांचा पद्मविभूषणाने गौरव केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. देशात हिंदू नेत्यांचं राज्य असताना, सुद्धा हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. हे हिंदूंच दुर्दैव आहे, अशी उपरोधिक खंतही व्यक्त केली.
देशात हिंदू समाजाचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे हा मोर्चा निघाला असेल, तर चांगली गोष्ट आहे. आठ वर्ष देशात मोदी आणि शाह यांचं राज्य आहे. तेव्हापासून सकल हिंदू समाजाचा आक्रोश सुरु झाला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

त्याचबरोबर या हिंदू जनआक्रोश मोर्चाने एक गोष्ट सिध्द केली आहे की, देशात हिंदू म्हणून घेणाऱ्या सर्वशक्तिमान नेत्यांचे राज्य असतानाही सर्व हिंदूना आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे. हे अपयश कोणाचे आहे? कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यांना पद्मविभूषण मग हिंदू आक्रोश करणारच सांगत शिवसेना आणि शिवसेना भवन सर्व हिंदूचे एकमेव आशास्थान असल्याचे सिध्द झाल्याचेही ते म्हणाले.

 

 

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *