Breaking News

पुण्यातील त्या घोषणेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा, असले नारे खपवून घेणार नाही.. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांना सोडणार नाही

पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या भूमीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपवून घेतले जाणार नाहीत. ही छत्रपती शिवरायांची पावनभूमी आहे. इथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे देशभक्तांचे राज्य आहे. कोणालाही अशाप्रकारे घोषणाबाजी करण्याचा अधिकार नाही. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. यामध्ये गृहविभाग, पोलीस विभाग अतिशय गांभीर्याने या सगळ्या वृत्तीकडे पाहतोय. गृहविभाग त्यांचा कडेकोट बंदोबस्त करेल. या देशात देशद्रोही लोकांना कुठलही स्थान दिलं जाणार नाही. जे देशविरोधी, राज्यविरोधी कृत्य करत असतील त्यांचा योग्य समाचार गृहविभाग नक्कीच पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.

वेदान्तबाबत मी या अगोदर माझी भूमिका मांडलेली आहे. त्याला जबाबदार कोण आहेत? चोराच्या उलट्या बोंबा कोणाच्या आहेत, हे लवकरच बाहेर येईल असेही त्यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एनआयएने कोंढवा भागात केलेल्या कारवाईविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *