Breaking News

दिवाळी नंतर उडणार मनपा निवडणुकांचा बार? गणेशोत्सवातील गणेश दर्शनाचे निमित्त त्यासाठीच

कोरोना काळातील कडक निर्बधामुळे सार्वजानिक सण उत्सव साजरे करण्यात मोठा अडसर होता.परंतू आता सार्वजानिक सण उत्सवाचे योग जळवून लोकांच्या कार्यकत्त्यांच्या भेटीगाठी यातूनच मनपा अर्थात महापालिकांच्या निवडणुकांची तयारी भाजपा, शिंदे गट आणि मनसेने यांनी मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.

सध्या सार्वजानिक गणेशोत्सव सुरू आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती दर्शनाच्या निमित्तानं वेगवेगळे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी तसेच त्यांच्याशी संबंधित मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. जवळपास ५०० गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्याचे सांगण्यात येते. या दर्शनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरें यांच्या मूळ शिवसेने सोबत असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात सामिल करून घेण्याचा उद्देशही असल्याचं म्हटलं जातं. गणेश दर्शनाच्या निमित्तानं शिंदे गट, भाजपा आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिकाधिक वाढत आहे. यातून राजकीय गणितांची जुळवाजुळव करून महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच घेण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठविण्याची शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेली मागणी यातून शिंदे गटाकडून निवडणुका लवकरच घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येते.

मुंबई मनपासह राज्यातील इतर मनपांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. अशातच सर्वच पक्षांनी निवडणुकासाठी कंबर कसली आहे. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत बंडखोरी यामुळे या निवडणूका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील असे ग्राह्य धरून शिंदे-फडणवीस सरकारची तयारी सुरू आहे. गणेशोत्सवानंतर मंत्री तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आपापल्या जिल्ह्यात दौरा करून जनमत आजमविणार आहेत त्याचीही जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.

एकेका मंत्र्यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाणार असून यामध्ये जनाधार जर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने दिसला तर नोव्हेंबर मध्ये निवडणुका घेण्याबाबत सरकार आग्रही राहील अशीही माहिती आहे. या निवडणुकांअगोदर शिंदे गट आपणास शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं याकरीता निवडणूक आयोग आणि न्यायालयात प्रयत्नशील आहे. मुंबई मनपा निवडणुकांची तयारी म्हणून अमित शाहचा झालेला मुंबईचा दौरा आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी यातून त्यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच ठाणे नवी मुंबई महापालिकेसाठी काल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच मनोमिलन ही निवडणुकांचीच तयारी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी लालबागच्या राजासह अनेक गणपती मंडळांमध्ये उपस्थिती लावली. तसेच, भाजपाच्या मुंबई महापालिका मिशनचाही श्रीगणेशा झाला. यावेळी अमित शाह यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तसेच संबोधितही केलं. अमित शाह यांच्या बैठकीनंतर भाजपानं मुंबई जिंकण्यासाठी आखलेल्या मेगाप्लानची माहिती समोर आली आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *