Breaking News

शिंजो आबे यांचे पाच तासानंतर अखेर निधन जाहिर सभेत मारेकऱ्याने गोळ्या झाडल्याने गंभीर जखमी झाले

काही महिन्यापूर्वी दुसऱ्यांदा निवडूण आल्यानंतरही आपल्या आजारपणामुळे जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेले आणि भारताचे मित्र म्हणून ओळखले जाणारे शिंजो आबे यांच्यावर आज भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ८.३० वाजता प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पाच तास मृत्यूबरोबरची सुरु असलेली झुंज भारतीय वेळेनुसार दुपारी १.३३ वाजता संपल्याने अखेर डॉक्टरांनी आबे यांचे निधन झाल्याचे जाहिर केले.

भारतीय वेळेनुसार सकाळी त्यांची जपान मधील नारा या शहरामध्ये पक्षाच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. शिंजो आबे यांचे भाषण सुरु असतानाच एका मारेकऱ्यांने त्यांच्यावर पिस्तूलातून दोन फैरी झाडल्या. त्यानंतर आबे हे खाली जमिनीवर कोसळले. सुरुवातील सभेसाठी उपस्थित असलेल्या समुदायाला काहीच समजले नाही. मात्र लगेच आबे यांना कोसळलेले आणि त्यांच्या शरीरातून रक्त वाहत असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांना आणि वैद्यकीय यंत्रणेला पाचारण करण्यात आले. आणि आबे यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टारांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली.

आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते ६७ वर्षांचे होते, असं एनएचकेने म्हटलं आहे. आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये एका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावरील या सभेमध्ये आबे यांचं भाषणा सुरु असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते. ही घटना शुक्रवारी सकाळी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता वाजता घडली.

आबे हे शहरातील एका रस्त्यावर भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला आणि घटनास्थळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले, असे एनएचकेने सांगितले. घटनास्थळावरील एनएचकेच्या पत्रकाराने सांगितले की, आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांना सलग दोन गोळ्यांचे ऐकू आले.

गोळी लागल्यानंतर आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचाही दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला होता केलेला. आबे यांना बेशुद्धावस्थेतच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते ६७ वर्षांचे होते असं एनएचकेने म्हटलं आहे. आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *