Breaking News

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कुलाबा वेध शाळेने व्यक्त केला अंदाज

जवळपास जूनचा अर्धा महिना गेला तरी मान्सूनने मुंबईसह राज्यातील अनेक भागात मान्सूनने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे यंदा मान्सून महाराष्ट्रावर नाराज होवून तसाच जाणार की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता मागील दोन –तीन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे. त्यातच आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जून ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.  

कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरातील घाट भागातील काही ठिकाणी २२ ते २५ जून दरम्यान पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार  पाऊस  पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

२२ जून रोजी मराठवाड्यात वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पुण्यातील घाट भागातील काही ठिकाणी२३ ते २५ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र- गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर २२ जूनच्या मध्यारात्रीपर्यंत ३-३.१ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *