Breaking News

मीम्सचा चेहरा बनलेले पाकिस्तानचे अँकर आमीर लियाकत हुसैन यांचे निधन वयाच्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय

भारतातील जवळपास अनेक मीम्समध्ये दाढीवाल्या एका व्यक्तीचा हसतानाचा आणि वाह.. वाह असे म्हणताचा व्हिडिओ आपण सर्रास पाहिला असेल. त्या व्यक्तीची माहिती फारशी कोणाला माहिती नाही. परंतु त्या व्यक्तीचा व्हिडिओ अनेक मीम्समध्ये वापरला गेल्याने ती व्यक्ती म्हणजेच मीम्स अशी एकप्रकारे समीकरण जुळले होते.

मात्र त्या दाढीवाल्या व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानचे सुप्रसिद्ध अँकर आणि खासदार आमीर लियाकत हुसैन यांचा आहे. त्यांचे आज कराचीमध्ये निधन झाले. आमिर लियाकत हुसैन सोशल मीडियावर व्हिडिओ मीम्सचा चेहरा बनला होते. पाकिस्तानच्या जिओ न्यूज नेटवर्कने ही बातमी दिली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. आमिर लियाकत हुसेन ४९ वर्षांचे होते.

८ जूनच्या रात्रीपासून आमिर यांची प्रकृती खालावली होती. त्याला दवाखान्यात नेण्याचा प्रसंग आला तेव्हा त्याने जाण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी आपल्या खोलीत वेदनेने आरडाओरडा केल्यावर त्यांचा मदतनीस तेथे पोहोचला. मात्र दरवाजा बंद होता. दरवाजा तोडला असता तो खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिओ न्युजने दिली.

आमिर लियाकत यांचा जन्म १९७२ मध्ये कराचीमध्ये झाला. नुकतेच ते दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट आणि तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते. त्यांचे दुसरे लग्न २०१८ मध्ये तौबा अन्वरसोबत झाले होते. त्यानंतर तौबा अन्वरपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी २०२२ साली स्वतःहून ३१ वर्षांनी लहान असलेल्या दानिया शाहसोबत लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी १८ वर्षीय दानियाने त्याच्याकडे घटस्फोट मागितला होता.

आमिर हे मार्च २०१८ मध्ये, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षामध्ये सामील झाले होते. यानंतर ते कराचीमधून खासदार म्हणून निवडून आले. मात्र, नंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पीटीआयमध्ये येण्यापूर्वी ते मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंटचे मोठे नेते होते. पण ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांनी पक्षापासून फारकत घेतली. त्यावेळी त्यांनी राजकारण सोडत असल्याची घोषणा केली होती.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *