Breaking News

सोलापूर-दौंड रेल्वे मार्गावर रेल्वेचा १७ दिवसांचा पॉवर ब्लॉक काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले

उन्हाळी सुट्टी असल्याने बाहेरगावी आणि फिरण्याच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पुणे-दौड मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी असून सोलापूर विभागातील दौंड येथी रोड अंडर ब्रीज बांधण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने या पुणे ते सोलापूर दरम्यान १७ दिवसांचा पॉवर ब्लॉक जाहिर केला आहे. त्यामुळे काही एक्सप्रेस, पॅसेंजर आणि मेल गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत दिली आहे.
हा पॉवर ब्लॉक 13 मे 2022 पासून सुरु होणार असून तो 29 मे 2022 रोजी पर्यंत राहणार आहे. या कालावधीत रद्द करण्यात आलेल्या गाड्या…
1) 14 मे, 16 मे, 21 मे, 23, 24, 28 मे रोजी धावणारी पंढरपूर-दादर गाडी क्र.11028 ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
2) तर सोलापूर ते पुणे दरम्यान धावणारी पुणे सोलापूर डेमू गाडी क्र.11422 ही 13 मे ते 29 मे रोजी या कालावधी करीता रद्द कऱण्यात आली आहे.
3) 13 मे, 15, 16, 20, 22, 23, 27, 29 मे या कालावधीत मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणारी रेल्वे गाडी क्र. 11027 ही रद्द करण्यात आली आहे.
4) गाडी क्र. 01521 ही पुणे-दौंड मार्गावर धावणारी गाडी 13 मे ते 29 मे या कालावधीत रद्द कऱण्यात आली आहे.
5) गाडी क्रमांक 01523 ही दौंड-बारामती धावणारी गाडी 13 मे ते 29 मे या कालावधीत रद्द कऱण्यात आली आहे.
6) गाडी क्र.01522 ही दौंड ते पुणे दरम्यान धावणारी गाडी 13 मे ते 29 मे या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.
7) गाडी क्र. 01524 ही दौंड-पुणे शटल गाडी 13 ते 29 मे या कालावधीकरीता रद्द करण्यात आली आहे.
8) याशिवाय गाडी क्रं. 01511 पुणे-बारामती डेमू गाडी 13 मे ते 29 मे या कालवधी करीता रद्द करण्यात आली आहे.
9) याशिवाय गाडी क्रमांक 12157 आणि 12158 ही पुणे-सोलापूर आणि सोलापूर पुणे दरम्यान धावणारी हुतात्मा एक्सप्रेस 13 मे ते 29 मे याकालवधी करीता रद्द करण्यात आली आहे.
तसेच पुणे-सोलापूर डेमू, पुणे दौंड डेमू, पुणे-भुसावळ स्पेशल, बारामती-दौंड डेमू, भुसावळ-पुणे स्पेशल, दौंड-बारामती डेमू, पुणे निझामाबाद डेमू, पुणे-दौंड डेमू, निझामाबाद-पुणे डेमू , पुणे-दौंड डेमू, बारामती-दौंड पॅसेंजर, निझामाबाद-पंढरपूर डेमू, पंढरपूर-निझामाबाद डेमू अशा मिळून एकूण 25 गाड्या 13 मे ते 29 मे या कालावधीकरीता रद्द करण्यात आल्या आहेत.
आशिंक गाड्या रद्द खालील प्रमाणे,
इंदौर-दौंड एक्सप्रेस पुणे पर्यंत धावणार असून सदर गाडी 12 मे ते 28 मे या कालावधीकरीता ही व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच 15 मे रोजी दौंड ग्वाल्हेर ही गाडी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. त्याचबरोबर हैद्राबाद-हडपसर ही गाडी काही दिवसांसाठी बार्शी स्थानकापर्यंत धावणार आहे. तर बंगलोर-मुंबई ही उद्यान एक्सप्रेस 25 मे ते 28 मे या कालावधीत सोलापूर स्थानकापर्यंत धावणार आहे. तर पनवेल-नांदेंड एक्सप्रेस 25 ते 28 मे या कालावधीत कुर्डुवाडी स्थानका धावणार आहे. अशा 5 गाड्या अंशिक रद्द करण्यात आल्या आहेत.

सविस्तर तक्ता खालीलप्रमाणेः

Check Also

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *