Breaking News

युक्रेनमधून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आयोगाने घेतला “हा” निर्णय भारतात इंटरशिप करण्यास परवानगी

रशियाने युक्रेन विरोधात सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना भारतात जीव मुठीत पकडून परतावे लागले. यापार्श्वभूमीवर अशा वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात इंटरशिप करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने परवानगी दिली आहे.

युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. त्यापैकी काही मायदेशी परतले असून काहींना लवकरच आणलं जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी हे युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी गेले होते.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून परदेशी वैद्यकीय पदवीधरांना कोरोना विषाणू तसेच युक्रेनमधील युद्ध यांसारख्या त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप देशात पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. आयोगाच्या परिपत्रकानुसार जर उमेदवारांनी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (FMGE) उत्तीर्ण केली असेल तर इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अर्जावर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते.

कोरोना विषाणू आणि युद्ध अशा परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप असलेले काही परदेशी वैद्यकीय पदवीधर देखील आहेत. या परदेशी वैद्यकीय पदवीधरांना होणारा त्रास आणि तणाव लक्षात घेऊन, त्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येईल असेही परिपत्रकान्वये स्पष्ट केले.

इंटर्नशिप पूर्ण करण्याची परवानगी युक्रेनमधील विविध वैद्यकीय महाविद्यालयातील भारतीय विद्यार्थ्यांना मदत करू शकते, ज्यांना रशियन आक्रमणामुळे आपले अभ्यासक्रम सोडावे लागले. आयोगाच्या या निर्णयामुळे शेकडो भारतीय विद्यार्थांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र युक्रेनच्या विद्यापीठांनी तशी मान्यता दिल्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना होवू शकतो.

 

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *