Breaking News

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहित म्हणाले, केंद्राचा “तो” कायदा रद्द करा मालवाहतुकदारांसाठीची जाचक नियमावली रद्द करावी !:नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम

देशातील प्रदुषणाच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुदत संपलेली वाहने मोडीत काढत माल वाहतूकदारांना वजनांचे बंधन घालणारा नवा सुधारीत कायदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लागू केला. मात्र या कायद्यामुळे माल वाहतूकदारांचे नवे प्रश्न निर्माण होत असल्याने राज्यात हा कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. मागील दोन वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. उद्योग व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. त्यात आता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मालवाहतुकीसंदर्भात जाहीर केलेली नियमावली जाचक ठरत असून ही अन्यायपूर्ण नियमावली महाराष्ट्र सरकारने रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने जारी केलेली नियमावली महाराष्ट्रातही लागू केली आहे. या नियमावलीने शेतकरी, मालवाहतुकदार यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ट्रक, टेम्पो, पिकअप यासारख्या मालवाहतुक गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा एक किलो माल जरी जास्त झाला तरी ओव्हरलोडच्या नियमाखाली किमान ६८ हजार रुपये दंड आकारला जातो. यातून मोठा आर्थिक फटका बसत आहे. या प्रकरणी लक्ष घालून महाराष्ट्रात हे जाचक नियम रद्द करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या परिवहन विभागाचे अध्यक्ष सुरज चिंचोले यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे याबाबत दाद मागितली असता त्याची दखल घेऊन पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलासा देण्याबाबत पत्र पाठविले आहे.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या या नव्या कायद्यामुळे अनेक वाहने भंगारमध्ये निघत आहेत. तसेच ट्रान्सपोर्ट वाहतूकदारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्राच्या त्या कायद्यामुळे एकाबाजूला मुदत संपलेल्या वाहने बाद झाल्याने प्रदुषणाचा प्रश्न सुटत असला तरी दुसऱ्या बाजूला माल वाहतूकदारांना निर्धारीत केलेल्या वजनापेक्षा थोडा जरी जास्त वजनाचा माल गाडीत आढळून आला तर मोठा आर्थिक भार सोसावा लागणार आहे.   यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात बोलणार की नाही याचे उत्तर भविष्यकाळात मिळेल.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हेच ते पत्र-

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *