Breaking News

नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा नवा अध्यक्ष कोण? सिडको प्राधिकरण अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागा आता सर्वसाधारण जागा म्हणून जाहीर कराव्या लागणार आहेत. तसेच आगामी काही काळ या ओबीसी जागांचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्यातच अनेक महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत पूर्ण होवूनही निवडणूकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यापार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या संभावित निवडणूकीच्या दृष्टीने सिडकोच्या अध्यक्ष पदावरही राष्ट्रवादी काँग्रेसचा व्यक्ती असावा यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सिडकोच्या पदावर मागील आघाडी सरकारच्या काळातील हिंदूरराव यांना अध्यक्ष पदी बसवायचे की नव्या चेहऱ्याला संधी द्यायची यावर जवळपास निर्णय झाला असल्याने लवकरच सिडकोला अध्यक्ष निर्माण झाली आहे.

मागील अनेक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेत आणि स्थानिक मतदारसंघात गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. मात्र मागील खेपेला गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश करत नवी मुंबई भाजपामय केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी काहीही करून गणेश नाईक यांच्या ताब्यातील नवी मुंबई महानगरपालिका हिसकावून घेण्याचा चंग बांधला आहे. कोविड काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित मेळाव्यांमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही केली. मात्र कोरोना काळामुळे येथील निवडणूकांना स्थगिती मिळाली. त्यातच आता ओबीसींच्या आरक्षित जागांवरून नवा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे साधारणत: तीन महिन्यानंतर रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणूका पुन्हा घेण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सिडको जर ताब्यात ठेवून सिडकोच्या माध्यमातून गणेश नाईक यांच्या विरोधात राजकिय लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. तसेच आगामी निवडणूकांच्या पूर्वी अध्यक्षाची नियुक्ती करून महापालिका निवडणूकीत रसद पुरविण्याचा रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला नव्याने ताकद उभी करण्यास मदत होईल असेही सांगण्यात येत आहे.

यापूर्वी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूरराव यांच्या माध्यमातून नवी मुंबईत पक्षाला पाठबळ देण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच फॉम्युल्यानुसार यंदाही सिडकोचे अध्यक्ष पद ताब्यात ठेवून पक्ष वाढविण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून झाल्याचे पक्षातील स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

सिडको हे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी लागली आहे. काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यात राज्यातील विविध महामंडळे आणि त्यावरील नियुक्त्यासंदर्भात चर्चा झाली. त्या बैठकी दरम्यान राष्ट्रवादीकडून महत्वाची महामंडळे स्वत:कडे मागितल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महामंडळावरील नियुक्त्यांबाबत आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दिली होती. मागील आघाडी सरकारच्या काळात हे पद दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या वाटय़ाला सिडको, म्हाडा, एमएमआरडीए आणि प्रदूषण मंडळ आदी आले होते. मात्र सध्या आघाडीत यावरून वाद सुरू आहेत.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *