Breaking News

रामदास कदम यांच्या आरोपावर अनिल परबांचे सूचक वक्तव्य… मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांना गद्दार म्हणून आरोप करत मला आणि माझ्या मुलाला संपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी एक शिवसैनिक आहे. मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. नो कॉमेंट्स म्हणत रामदास कदम यांच्या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

तसेच त्यांनी काहीही म्हणू दे. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्यावर त्याचं उत्तर मी देणार नाही. मी एक शिवसैनिक आहे ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबतची जी काही दखल घ्यायचीय ती पक्ष घेईल असे परब यांनी सांगत रामदास कदम यांची शिवसेनेतील पुढील वाटचाल आता आणखी खडतर बनणार असल्याचा सूचक विधान केले.

अनिल परब यांच्यावर रामदास कदम यांनी कोणते केले आरोप-

रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या सर्वात मोठा आरोप केला तो म्हणजे अनिल परब हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मदतीने शिवसेनेच्या ताब्यात असलेली नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालत आहे. तसेच मी गद्दार नाही तर अनिल परबच गद्दार आहे.

-मला आणि माझ्या मुलाला तिकिट मिळू नये यासाठी अनिल परब प्रयत्न करत होता.

-मला आणि माझ्या मुलाचे राजकिय आयुष्य उध्द्वस्त करण्यासाठी तीन तीन दिवस दापोलीत तळ ठोकून बसत आहे.

-परबाकडे एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नाही मात्र आमचे राजकिय उद्धवस्त करण्यासाठी वेळ आहे.

-परबांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्याचे पाय जमिनीवर नाहीत.

-अनिल परब यांची वैयक्तिक मालमत्ता म्हणजे शिवसेनेची मालमत्ता नाही. परब म्हणजे शिवसेना नाही.

– शिवसेना वाढविण्यासाठी मी संघर्ष करत असताना अनिल परब कुठे होता असा सवाल करत परब यांच्याबाबत असलेली नेमकी भावना रामदास कदम यांनी बोलून दाखविली.

दरम्यान, त्या कथित ऑडिओ क्लिपमधून अनिल परब यांच्याबद्दलची खाजगी माहिती रामदास कदम यांनी एका व्यक्ती मार्फत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे परब यांच्यावरील आरोपामागे रामदास कदम हेच असल्याचा संशय निर्माण झाला होता.

परंतु आज रामदास कदम यांनी थेट पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर थेट आरोप केल्याने त्यास आणखीनच पुष्टी मिळत आहे. त्याचबरोबर उदय सामंत यांना पक्षात आयात केलेल्या नेत्याला राज्य मंत्रिमंडळात महत्वाचे खाते दिल्याबद्दलची एकप्रकारची खदखद कदम यांनी व्यक्त केल्याने शिवसेनेत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *