Breaking News

जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा गृहनिर्माण मंत्री आव्हाडांना सवाल

मराठी ई-बातम्या टीम

मागील आठभऱ्यापासून म्हाडाच्या नोकर भरीत परिक्षेमध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसार माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड हे आवाहन करत होते. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राज्याचे गृह खाते असतानासुध्दा आव्हाडांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली असा उपरोधिक सवाल भाजपा आमदारा गोपीचंद पडळकर यांनी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांना केला.

प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात अशी खवचट टीका करत पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचा आरोप त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेत घोटाळा होणार असल्याचे दिसून आल्याने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नियोजित परिक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा त्यांच्या ट्विटरवरून केली. त्यानंतर यासंदर्भातील त्यांनी एक व्हिडिओही प्रसिध्द केला. त्यांच्या घोषणेनंतर भाजपा आमदार पडळकरांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परिक्षामध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली. यावरून सिद्ध होते की प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

एक एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणंघेणं नाहीये असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या परिक्षार्थींची माफी मागत आगामी परिक्षा या म्हाडाकडूनच घेण्यात येणार असल्याचे जाहिर करत या परिक्षा जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. तसेच आधीच्या परिक्षार्थींच्या परिक्षा फीचे पैसेही परत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *