Breaking News

साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे ३० जणांचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने साहित्य व संस्कृती मंडळाची नवी समिती जाहिर केली असून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षते पदी निवड करण्यात आली आहे. त्याच्यासह दलित साहित्यिक डॉ.प्रज्ञा पवार, फ.मु.शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

राज्य सरकारने जाहिर केलेल्या समितीत ज्येष्ठ साहित्यिक अरूण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, श्रीमती नीरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रविण बांदेकर, मोनिका गजेंद्रगडकर, भारत ससाणे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.रविंद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, एल.बी.पाटील, पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ.आनंद पाटील, प्रा.शामराव पाटील, दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रविंद्र बेडकीहाळ, प्रा.रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाट, डॉ.संतोष खेडलेकर आदींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीची मुदत तीन वर्षांची राहणार आहे.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *