Breaking News

पंतप्रधान मोदीच्या दाढीसोबतच चालू असलेली गॅस दरवाढीची स्पर्धा थांबवा गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी

गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर शेणाच्या गोव-यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वाढत्या दाढीबरोबर गॅसच्या किंमतींची स्पर्धा केंद्र सरकारने सुरु केली आहे. ती थांबवावी अन्यथा पेट्रोलपंपावरील फलकाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी वाशिम येथे रस्त्यावर उतरून या चूलींवर भाक-या बनवून मोदी सरकारचा निषेध केला. दरम्यान यापुढील आंदोलन आता पेट्रोलपंपावरील उज्वला गॅस योजनेच्या लावलेल्या मोदींच्या होर्डिंग्जच्या विरोधात असेल असा सज्जड इशारा प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिला.

गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याबाबत केंद्र सरकार अजिबात संवेदनशील नाही. ही योजना ५ कोटी महिलांपर्यंत पोहोचविण्याची योजना होती. ती पोहोचली की नाही माहीत नाही, पण महिलांना मात्र या दरवाढीने मोदी सरकारने रडवले आहे. त्यांच्या या दरवाढीमुळे महिला वर्गाचे बजेट कोसळले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कुठल्याही योजना आणल्या नाही. त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधात आहे. शिवाय ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, तिथे महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आरोपींना पाठीशी घालण्याचे धोरण सरकारने राबवले आहे असा आरोपही त्यांनी केला.

महिलांसाठी काम करणा-या महाराष्ट्रातीलच काय पण इतर राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत सरकार अजिबात संवेदनशील नाही, तर महिलांच्या विरोधात आहे. आमच्या माताभगिनींच्या कराच्या पैशातून पेट्रोलपंपावर होर्डिंग्ज लावून जाहिरात करत आहे, त्यामुळेच या होडिंग्जच्या विरोधात यापुढील काळात आंदोलन करण्याचा इशाराही  त्यांनी दिला.

 

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *