Breaking News

केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी, शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा सूचनेचा निर्णय काँग्रेस आणि शरद पवारांना घेण्याची विनंती

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. माझ्या या सुचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

काँग्रेस देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे.मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता १०० खासदार ही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. राहुल गांधी ही काँग्रेस चे अध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार नाहीत त्यामुळे काँग्रेस ला नवी उभारी देण्यासाठी मूळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे शरद पवार यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपवावे अशी माझी सूचना असल्याचे ते म्हणाले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *