Breaking News

अखेर तावडेंच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्वातंत्र्य संपुष्टात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी
माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणत या मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण असताना काही मोजक्या मुलांसाठीच उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याकरिता संलग्नता देणे योग्य आहे का असा आक्षेप घेण्यात आला होता. तसेच विनोद तावडे यांच्या या निर्णयाच्या विरोधात शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अखेर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला. त्यानुसार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
कोणत्याही नवीन अभ्यासक्रमास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे, पण तसे करण्यात आले नाही. राज्याची दोन परीक्षा मंडळे असू नयेत असे शालेय शिक्षण विभागाचे मत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले.
राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार करण्याचे ठरले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *