Breaking News

हवामान

स्कायमेट म्हणते, भारतीय हवामान खात्याची “ती” माहिती चुकीची केरळात मान्सून दाखल नाहीच

वाढत्या उन्हाच्या काहिलीने संपूर्ण भारतीय त्रस्थ झालेले असताना कधी एकदा मान्सूनचे आगमन होते आणि वातावरणात बदल होवून दिलासा मिळतो याची वाट पहात असताना नुकतेच भारतीय हवामान खात्याने केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहिर केले. मात्र भारतीय हवामान खात्याने जाहिर केलेली माहिती चुकीची असल्याचा दावा स्कायमेट या खाजगी हवामान कंपनीने केली. त्यामुळे …

Read More »

हवामान खात्याने दिली आनंदाची बातमी; केरळात तीन दिवस आधीच मान्सून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची धीमी वाटचाल

मागील काही दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे कधी होते मान्सूनच्या पावसाचे आगमन याची उत्सकुता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागल्याने किमान काही काळ तरी हवेत गारवा निर्माण होतो. परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे सुर्याच्या उष्ण किरणांनी चांगलीच …

Read More »

उखाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात लवकरच मान्सून: फक्त पाच दिवस बाकी १५ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमनाची शक्यता

मागील काही दिवसात महाराष्ट्रासह उत्तर भारतात तापमानात वाढ झालेली असल्याने उन्हाच्या रखरखीने राज्यातील जनतेला चांगलेच हैराण करून सोडले. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर वातावरणात थोडासा गारवा निर्माण व्हावा यासाठी मान्सूनच्या सरी कधी कोसळतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असताना मान्सूनने अंदमानच्या बेटावर आपली हजेरी …

Read More »

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

वातावरणीय बदलांवरील उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक घटकाने वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. ‘क्लायमेट चेंज 2.0 – मोबिलायझिंग फंड फॉर कोस्टल सिटीज’ या विषयावरील …

Read More »

देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता आयएमडीचे महासंचालक डॉ. एम महापात्रा

मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने दिल्यानंतर आज पुन्हा आगामी मे महिन्यात सुर्य आग ओकणार असल्याचा इशारा देत येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मे महिना हा वर्षातील …

Read More »

वरुणराजाच्या आगमनाने छत्र्या बाहेर तर थंडी पळाल्याने स्वेटर कपाटात अवकाळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ

मुंबई: प्रतिनिधी डिसेंबर महिना म्हटलं की गुलाबी थंडीचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. मात्र पर्यावरणातील बदलामुळे यंदा डिसेंबर उजाडला तरी वरूणराजाने अजून एक्झिट घेतली नाही. त्यामुळे आज महिन्याचा पहिला दिवस असताना मुंबईत सकाळपासूनच ढगांनी गर्दी  करत वरूणराज्याचे आगमन झाले. त्यामुळे सुर्यनारायणाला ढगांच्या आड लपण्याची नामी संधी मिळत सुट्टीवर जाणे भाग पाडले. …

Read More »

एसटी बस होणार आता प्रदुषण मुक्त : या इंधनावर धावणार डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर- परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. कोरोना …

Read More »

जमिनीवरील कायदे आपले पण… नियम न पाळल्यास निसर्ग न्याय ही करतो वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आपण विविध दिनविशेष साजरे करतो त्या विषयाची उत्सुकता आणि आस्था त्या दिवसापूरती नको. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्ये ही झाली पाहिजे असे सांगत जमिनीवरील कायदे आपले आहेत. पण निसर्गाचे नियम वेगळे असून ते नियम न पाळल्यास निसर्ग आपल्या पध्दतीने न्याय …

Read More »

४८ तास महत्वाचे तर गुलाब नंतर आता शाहीन चक्रीवादळाचा धोका हवामान खात्याचा मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीला इशारा

मुंबई: प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेली असली तरी या वादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातलेला आहे. मात्र आणखी पुढील ४८ तास महत्वाचे असून यामुळे या वादळाचा प्रभाव आणखी राहणार आहे. यापार्श्वभूमीवर अरबी समुद्रात गुलाब चक्रीवादळ पुन्हा निर्माण …

Read More »

गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मुंबई : प्रतिनिधी काल गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून ते पूर्व किनार पट्टीकडे सरकरत आहे. आज मध्यरात्री ते गोपाळपूर आणि कलिंगपट्टणम येथे धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. गुलाब चक्रीवादळामुळे २७ तारखेला मराठवाडा …

Read More »