Breaking News

Tag Archives: union government

देशातील पहिला कॅनल जोड प्रकल्प सोलापूरात, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी २२ गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ५२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. …

Read More »

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालय दालनात मंत्री सत्तार यांनी केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या विविध कृषी योजना,  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, नानाजी …

Read More »

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाची अमंलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी, प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा

प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज …

Read More »

मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना केंद्राने घेतले स्वत:च्या अखत्यारीत ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर तडकाफडकी बदली

मुंबईसह राज्यातील १४ महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरू झालेल्या असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची तडकाफडकी केंद्र सरकारने बदली करत केंद्र सरकारच्या एका विभागात सचिव पदी वर्णी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात आयुक्त चहल यांनी केलेल्या कामाचे कौतुक देशभरासह आंतरराष्ट्रीयस्तरावरही झाले होते. त्यामुळे त्यांची अशा …

Read More »

अजित पवारांनी सांगितली व्हॅट करातून केंद्राला दिलेल्या महसूलाची आकडेवारी राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला

Ajit Pawar

व्हॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली. त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली पाहिजे असे बोलत आहे. परंतु राज्य सरकारने जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केल्याची राज्य सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज …

Read More »

राज्यातील कौशल्य विकासविषयक योजनांचे जागतिक बँक, केंद्राकडून कौतुक कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाला प्रतिनिधींची भेट

संकल्प प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कौशल्य विकास मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेमार्फत नुकतीच ७ सदस्यांनी राज्याला भेट दिली. राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन समिती सदस्यांनी त्याचे कौतुक केले. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून त्यांना विविध योजनांची माहिती दिली. …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षणासंबधी केंद्राचे राज्याला पत्रः बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे भरा आता खुल्या वर्गाबरोबर आरक्षित प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीतील आरक्षणाविषयीच्या याचिकेवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यामुळे जरी फक्त खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सध्या पदोन्नती मिळत असली तरी आता आरक्षित वर्गातील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभावित अधीन राहुन पदोन्नती देण्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच केंद्राच्या कार्मिक मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. पदोन्नतीतील …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, धारावी रखडली…काय तो एकदा निकाल लावला पाहिजे २९३ वरील चर्चेवर निवेदन करताना केला आरोप

मागील १५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले असून धारावीच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न कर आहे. काही योजना मनात असतात परंतु त्या आपल्या हातात नसतात असे सांगत पैसे देवून केंद्र सरकारने आपल्याला अद्याप जमीन हस्तांतरीत केली नसल्याने हा विकास रखडल्याचा आरोप मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी दोन वेळा लाट येवून गेली आहे. मात्र हा विषाणू काही केल्या जायला तयार नाही. मात्र या विषाणूपासून बचाव करून घेण्यासाठी विविध लसी बाजारात आलेल्या आहेत. यातील सर्वात प्रभावी म्हणून …

Read More »

मल्ल्या, मोदी, चौक्सीकडून १८ हजार वसूल केले केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

देशभरातील विविध बँकांना हजारो कोटी रूपयांचा गंडा घालत परदेशात जावून स्थाईक झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून तब्बल १८ हजार कोटी रूपयांची रक्कम वसूल करून पुन्हा बँकाना परत करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिल्याची माहिती पुढे आली आहे. विजय मल्ल्याने …

Read More »