Breaking News

Tag Archives: sharad pawar

अजित पवार + एकनाथ शिंदे- शरद पवार = शिवसेना उबाठा; कॉपी पेस्ट

बरोबर साधारणः दिड दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात पक्षाच्या आमदारांनी बंड केले. त्यानंतर लगेच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि तद्ननंतर विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदार प्रकरणी दिलेला निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एकच आर्श्चय व्यक्त करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेबाबतचा धुराळा खाली बसत नाही …

Read More »

राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे एकच मुख्य कार्यालय ?

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मंत्रालयासमोर आपले कार्यालय थाटले असले तरी या कार्यालयाला संपर्क कार्यालय असे नाव दिले असून राष्ट्रवादीचे मुख्य कार्यालय म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बॅलार्ड पियर येथील कार्यालयाचाच पत्ता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले …

Read More »

शरद पवार यांचे मोठे विधान,… ४ महिन्यात विधानसभेच्या निवडणूका

केंद्रात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षाने स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतील पक्षातील नेत्यांविरोधात विविध तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी केली आहे. आपल्या विरोधात दुसरा पर्याय उभा राहू नये याकरिता सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर आज केला. राष्ट्रवादी …

Read More »

रोहित पवार यांची ईडीकडून अद्यापही चौकशी सुरुच, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

देशासह राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने धाडसत्र राबविले. त्यानंतर ईडी अर्थात सक्तवसुली संचानालयाकडून आज चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार कर्जत जामखेडचे आमदार तथा शरद पवार …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, पिकविणारे जर संकटात तर खाणारे उपाशी…

संपुर्ण जगात शेतीक्षेत्रात मोठे बदल होत आहेत. वेगवेगळे आधुनिक संशोधन सुरु आहे. ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असेल तरच हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘कृषक’ अत्यंत उपयुक्त आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला. बारामती …

Read More »

शरद पवार यांचा मोदींवर हल्लाबोल, गरज शेतकऱ्यांची… कर्जमाफी मात्र उद्योजकांची

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठी भलत्याच प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत देशातील शेतकरी आजही कर्जबाजारी आहे. शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्याची गरज आहे. या …

Read More »

इंडिया आघाडीच्या प्रमुख नेते पदाची धुरा मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे

देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, जनता दल युनायटेडचे नितीशकुमार, आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल, शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत, द्रमुकचे नेते यांच्यासह अनेक प्रमुख पक्षाचे नेते ऑनलाईनरित्या उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडीच्या अध्यक्ष कोण असावा यावर …

Read More »

शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, तर ही घराणेशाही कशी ?

देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील मात्र त्याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही. देशातील प्रत्येक शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र तरीदेखील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसंदर्भात कुठलेही ठोस निर्णय घेण्यात येत नाही असा आरोप …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, विधानसभा अध्यक्षांचा निवाडा न्यायालयीन नव्हे तर….

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आलेल्या निकालानंतर पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दोन-तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, अयोध्येतील त्या गर्दीत जाणार नाही

पक्ष सोडून जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांना परत पक्षात जागा नाही. ३० वर्षांपासून आम्ही हा पक्ष चालवत आहोत, त्यात इन्फो कंपोज याची जबाबदारी ही अजित पवारांवरच होती तेव्हा त्यांनी आपल्या कामावर जबाबदारीवर कधी लक्ष दिले नाही; आज देत आहे तर ठीक आहे अशी उपरोधिक टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार …

Read More »