Breaking News

Tag Archives: mmrda

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएच्या पत्राला बिल्डरकडून वाटाण्याच्या अक्षता

मागील सहा वर्षाहून अधिक काळ राज्याचे नगरविकास मंत्री आणि सद्यस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जाहिर कार्यक्रमातून सांगत असतात. मात्र त्यांच्याच कार्यकाळात प्रकल्प बाधित नागरीकांना इमारत बांधून त्यांचे पुर्नवसन केले. परंतु त्या प्रकल्प बाधित नागरिकांना विकासकाने गळकी इमारत बांधून दिल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेकडे तक्रारीही …

Read More »

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील रस्ते खड्डे विरहीत असावेत यासाठी एमएमआरडीएने रस्त्यांची तपासणी करावी. अवजड वाहनांची वर्दळ असलेले रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि हलक्या वाहनांची वर्दळ असलेले रस्ते यूटीडब्ल्यू तंत्राने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रालयात आज …

Read More »

मुंबई महानगरातील ‘या’ रस्ते प्रकल्पांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री

मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …

Read More »

एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज, राज्य सरकारने दिली हमी ठाणे कोस्टल रोड, भुयारी मार्ग, शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी कर्ज

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस संपेना, आधी माईक, नंतर चिठ्ठी आणि आता कानात कुसफुस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेच्या कानात बोलत करून दिली आठवण एमएमआरडीएची

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवून देत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी झाला. मात्र या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. मात्र या सरकारच्या नव्याचे नऊ दिवस काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, कामे वेळेत करा पण कमीत कमी झाडे तोडा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला विविध कामांचा आढावा

मुंबई शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यामध्ये वरळी-शिवडी, नरीमन पॉईंट-कफ परेड या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ही कामे करताना नागरी सुविधा कमीत कमी बाधित होतील याची दक्षता घ्यावी, जेथे खोदकाम करावयाचे आहे तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था …

Read More »

मेट्रो प्रकल्पग्रस्तांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नगरविकासमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ ची लांबी २४.९ …

Read More »

कोणताही त्रास आणि अडथळ्याविना प्रवास करणे मुंबईत शक्य होणार सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरच विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगराचा वाहतूक आराखडा तयार करतांना सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे आहे असेही ते म्हणाले. एमएमआरडीएच्या सर्वंकष …

Read More »

वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास …

Read More »